India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

'आमच्याकडे शाहिन, नसीम, रौफ नाही, पण...' IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

Rohit Sharma: पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma on rivalry between India vs Pakistan ahead of Asia Cup 2023 Match:

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी सामना रंगणार आहे. कँडीमधील पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. क्रिकेटमधील हाय व्होल्टेज सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याला गणले जाते. या सामन्याबद्दल पूर्वसंधेला भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितने म्हटले आहे की जरी लोकांसाठी जरी ही शत्रुत्व असले, तरी त्यांच्यासाठी पाकिस्तान हा फक्त एक प्रतिस्पर्धी आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, 'आशिया चषकात खूप स्पर्धात्मक सहा संघ आहेत आणि ते एखाद्या दिवशी कोणालाही पराभूत करू शकतात.'

'लोकांना बोलण्यासाठी हे शत्रुत्व असेल, पण एक संघ म्हणून आम्ही एक प्रतिस्पर्धीच समजतो, ज्यांच्याविरुद्ध उद्या आम्ही सामना खेळणार आहोत आणि आम्ही पाहू की आम्ही काय करू शकतो. मैदानावर योग्य गोष्टी करत राहणेच आम्हाला मदत करणार आहे.'

पाकिस्तानने गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तान सध्या वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. याची रोहितनेही दखल घेतली आहे.

रोहित म्हणाला, 'पाकिस्तानने टी२० आणि वनडे क्रिकेटमध्ये नजीकच्या काळात चांगली कामगिरी केली आगे. त्यांनी अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी खरोखर मेहनत घेतली आहे आणि आमच्यासाठी हे चांगले आव्हान असेल.'

याशिवाय पाकिस्तान संघात शाहिन शाह आफ्रिदी, नसिम शाह आणि हॅरिस रौफ असे वेगवान गोलंदाज आहे, ज्यांनी गेल्या काही काळात फलंदाजांसमोर मोठे आव्हान ठेवले आहे. ते भारतीय संघासमोरही मोठे आव्हान ठेवू शकतात.

याबद्दल रोहित म्हणाला, 'हे पाहा, नेटमध्ये सराव करताना आमच्याकडे शाहिन, नसिम किंवा रौफ नव्हता. आमच्याकडे जे आहे, त्यातच आम्ही सराव केला. ते सर्व दर्जेदार गोलंदाज आहेत. आम्हाला फक्त उद्या त्यांच्याविरुद्ध खेळताना अनुभवाचा वापर करावा लागणार आहे.

रोहित सामन्याच्या रणनीतीबद्दल म्हणाला, 'आम्ही आमचे लक्ष्य लहान लहान ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जे आमच्यासमोर आहे, त्यावर लक्ष ठेवू. आम्हाला उद्या पाकिस्तानचा सामना करायचा आहे आणि आम्ही पहिले त्यावर लक्ष केंद्रीत करू आणि नंतर पुढचा विचार करू.'

'आम्ही अनेक खेळाडूंना वेळ दिला आहे आणि त्यांना सहा संघ खेळत असलेल्या स्पर्धेत खेळण्याची आता संधी आहे. जी समस्या होती, ती आम्ही सांगितली आहे. आता आम्हाला सामन्यात चांगले खेळण्याकडे लक्ष द्यायचे आहे.'

पाकिस्तानने आशिया चषकात नेपाळविरुद्ध विजय मिळवत चांगली सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना भारतासाठी आशिया चषक २०२३ मधील पहिला सामना असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT