Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: हिट मॅन चा फ्लॉप शो सुरुच, 'वेगवान सुरुवात करुनही...'

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी संघांच्या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव अग्रस्थानी आहे. या संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने ही सर्व विजेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) 2013 पासून संघाचा कर्णधार आहे. त्याच वर्षी मुंबईने पहिले विजेतेपद पटकावले होते. रोहितने केवळ कर्णधारपदच नाही तर फलंदाजीनेही संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु आयपीएल-2022 आतापर्यंत मुंबई (Mumbai Indians) आणि रोहित दोघांसाठीही चांगला राहिलेला नाही. मुंबईने पराभवाची हॅट्ट्रिक साधली असून रोहितही शानदार कामगिरी करु शकलेला नाही.

दरम्यान, शनिवारी दुसऱ्या सामन्यात मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होत आहे. त्याला या सामन्यात विजय मिळवण्याची नितांत गरज आहे. बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून मुंबईला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईला रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती परंतु या सामन्यातही तो आपला जलवा दाखवू शकला नाही.

वादळी सुरुवात पण...

रोहितने इशानसोबत डावाची सुरुवात केली. दोघांना वेगवान सुरुवात करायची होती, ज्यात ते यशस्वीही झाले. पॉवरप्लेमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या. गेल्या वर्षी पर्पल कॅप जिंकणाऱ्या हर्षल पटेलने रोहितचा डाव संपवला. सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पटेलने रोहितला बाद केले. रोहित पटेलच्या स्लो कटरमध्ये अडकला. त्याला चेंडू लेग साइडने खेळायचा होता, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पटेलच्या हातात गेला. रोहितने 15 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.

मागील सामन्यांमध्येही अपयश आले

मागील सामन्यांमध्येही रोहित अपयशी ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मोसमातील पहिल्या सामन्यात रोहित शानदार कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. मात्र मोठी धावसंख्या तो उभारु शकला नाही. रोहितने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 10 धावा केल्या. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याच्या बॅटमधून केवळ तीन धावा आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT