Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

Rohit Sharma Viral Six Video: येत्या 28 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत असून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Manish Jadhav

Rohit Sharma Viral Video: येत्या 28 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत असून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या हंगामात सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्स आणि त्यांचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे लागले आहे. रोहित सध्या फलंदाजीच्या सरावात पूर्णपणे व्यस्त असून, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रोहितने आपल्या खास शैलीत 'गगनचुंबी षटकार' ठोकला असून त्याच्या बॅटीचा हा तडाखा पाहून चाहते सुखावले आहेत. विशेष म्हणजे, हा षटकार ठोकल्यानंतर रोहितने स्वतःच मजेशीरपणे 'कॅच इट' अशी हाक मारली, परंतु चेंडू थेट पॅव्हेलियनमध्ये जाऊन पडल्याने कोणालाही तो पकडता आला नाही. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर मोठा प्रहार करताना दिसत आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका होत होती, मात्र सरावादरम्यान रोहित कमालीचा फिट आणि फॉर्मात दिसत आहे. जरी तो आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला, तरी संघाच्या रणनीतीमध्ये त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी टी-20 विश्वचषक पाहता रोहितसाठी हा आयपीएल हंगाम धावांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याने स्वतःच्या फलंदाजीवर आणि शारीरिक क्षमतेवर केलेले काम मैदानावरील त्याच्या हालचालींवरुन स्पष्टपणे जाणवत आहे. रोहितचा हा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी मोठे बलस्थान ठरु शकतो.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या प्रवासाचा विचार केल्यास गेल्या काही वर्षांत या संघाला अपेक्षित यश मिळालेले नाही. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाला 2020 नंतर एकदाही चषक उंचावता आलेला नाही. 2024 च्या हंगामात तर संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या म्हणजे 10व्या स्थानावर फेकला गेला होता. यंदा हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अनुभवी रोहित आणि युवा आक्रमक हार्दिक यांची जुगलबंदी या हंगामात कशी रंगते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रंगणार आहे. घरच्या मैदानात विजयाने सुरुवात करण्याचा मुंबईचा निर्धार असून रोहित शर्माची फटकेबाजी हे या सामन्याचे मुख्य आकर्षण असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM kisan 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा काउंटडाऊन सुरू; 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Goa Politics: 'आप'ला लक्ष्य करण्यासाठीच 'ईडी'चे छापे, भाजपाकडून पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न; वाल्मिकी नाईक यांची टीका

Goa Politics: वीरेश यांची पुन्हा चर्चेकडे पाठ! गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण, कार्यकर्त्यांत संभ्रम

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

SCROLL FOR NEXT