Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

ICC स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये 'रो'हीट' नंबर वन

रोहितने (Rohit Sharma) अफगाणिस्तानविरुद्ध 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) 2021 च्या T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी करु शकला नव्हता, मात्र अफगाणिस्तानविरुद्ध त्याने आपले सर्व प्रयत्न पूर्ण केले. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन देत त्याने सहकारी सलामीवीर फलंदाज केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 140 धावांची शतकी भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर रोहित शर्मा आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.

रोहित शर्माने जो रुटचा विक्रम मोडला

अफगाणिस्तानविरुद्धच्या 74 धावांच्या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्मा आता ICC स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 विश्वचषक या ICC स्पर्धांमध्ये एकूण 3682 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने जो रुटला मागे टाकले, ज्याच्या नावावर आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत एकूण 3662 धावांची नोंद आहे. या बाबतीत विराट कोहली 3554 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ICC इव्हेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 3 फलंदाज (WTC + WC + CT + WT20)-

3682 धावा - रोहित शर्मा

3662 धावा - जो रुट

3554 धावा - विराट कोहली

रोहित-राहुलने T20 मध्ये दुसरी सर्वोच्च भागीदारी केली

रोहित शर्माने एकीकडे 74 धावा केल्या, तर केएल राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 69 धावांची उपयुक्त खेळी केली. या दोन फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी झाली. टी-20 मध्ये भारतासाठी परदेशी भूमीवरील ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली.

T20I मध्ये भारताकडून परदेशी भूमीवर 5 सर्वात मोठी भागीदारी-

160 धावा, रोहित आणि धवन, डब्लिन

140 धावा, रोहित आणि राहुल, दुबई

136 धावा, सेहवाग आणि गंभीर, डर्बन

134 धावा, कोहली आणि रैना, अॅडलेड

123 धावा, रोहित आणि राहुल, मँचेस्टर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT