Rohit Sharma X/BCCI
क्रीडा

Rohit Sharma: शतक हुकलं, पण रोहितने 87 धावांसह केली विराटच्या विक्रमाची बरोबरी!

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England, Rohit Sharma Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने काही विक्रमांना गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात 101 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. वनडे वर्ल्डकपमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही रोहितची १२ वी वेळ होती. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितने दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या असेलल्या विराट कोहली, शाकिब अल हसन आणि कुमार संगकारा यांची बरोबरी केली आहे.

विराट, शाकिब आणि संगकारा यांनीही प्रत्येकी 12 वेळा वनडे वर्ल्डकपमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 21 वेळा वनडेत 50 धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 29 ऑक्टोबर 2023 पर्यंत) -

    • 21 वेळा - सचिन तेंडुलकर (44 डाव)

    • 12 वेळा - रोहित शर्मा (23 डाव)

    • 12 वेळा - विराट कोहली (32 डाव)

    • 12 वेळा - शाकिब अल हसन (34 डाव)

    • 12 वेळा - कुमार संगकारा (35 डाव)

    • 11 वेळा - रिकी पाँटिंग (42 डाव)

रोहितसाठी 2023 देखील खास

रोहितने वनडेमध्ये 2023 वर्षात 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. तो या वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा शुभमन गिलनंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे.

तसेच रोहितने वनडेमध्ये एका वर्षात 1000 धावा करण्याची ही एकूण पाचवी वेळ आहे. त्याने यापूर्वी 2013, 2017, 2018 आणि 2019 या चार वर्षीही वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

षटकारांचाही बादशाह

रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 2023 वर्षात आत्तापर्यंत 56 षटकारही मारले आहेत. त्यामुळे तो वनडेमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

गेलने 2019 वर्षात 56 षटकार मारले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर एबी डिविलियर्स असून त्याने 2015 साली 58 षटकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT