Ajinkya Rahane Retirement Rohit Sharma Emotional Post Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

Ajinkya Rahane Retirement Rohit Sharma Emotional Post: भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी रहाणेच्या योगदानाचे कौतुक केले असून, त्यात रोहित शर्मा याचाही समावेश आहे. रहाणेसोबत दीर्घकाळ ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या रोहितने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहित आपल्या मित्राविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

'तुझी मेहनत कायम प्रेरणा देणारी'

रोहित शर्माने आपल्या संदेशात रहाणेच्या मेहनतीचा, शिस्तबद्ध वृत्तीचा आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख केला. अनेक वर्षे भारतीय संघात एकत्र खेळताना रहाणेने संघासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करत त्याने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

रोहितने आपल्या संदेशात म्हटले की, अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये घालवल्यामुळे रहाणेने यश मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न इतरांपेक्षा वेगळे ठरले. उत्कृष्ट कारकिर्दीसाठी त्याने रहाणेचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. भावनिक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. या घोषणेदरम्यान त्यांच्या भावना अनावर झाल्याचेही चाहत्यांना पाहायला मिळाले.

रहाणेने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय खेळी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

विराट कोहलीचाही खास संदेश

रोहित शर्माप्रमाणेच माजी कर्णधार विराट कोहली यानेही रहाणेच्या निवृत्तीवर भावनिक प्रतिक्रिया दिली. कसोटी क्रिकेटमधील भागीदारी आणि स्लिपमधील रहाणेच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत विराटने त्याला भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू म्हटले. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या योगदानाचा अभिमान बाळगावा, असेही त्याने नमूद केले.

भारतीय क्रिकेटमधील प्रवास

अजिंक्य रहाणेची कारकीर्द केवळ धावसंख्येपुरती मर्यादित नव्हती. शांत स्वभाव, संकटाच्या वेळी जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता आणि संघभावना यामुळे त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा अध्याय संपला असला, तरी त्यांचे योगदान आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT