Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: रोहित शर्मा रडला! इंग्लंडकडून हरल्यानंतर टीम इंडिया झाली भावूक

India vs England: भारतीय कर्णधार रोहित शर्मा डगआउटमध्ये रडताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

India vs England: T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा डगआउटमध्ये रडताना दिसत आहे. या मानहानीकारक पराभवानंतर रोहीतचे डोळे पाणावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 168 धावा केल्या. तर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने अवघ्या 16 षटकांत ही धावसंख्या गाठली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये इंग्लंडचा सामना बाबर आझमच्या पाकिस्तानशी होणार आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या दणदणीत पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. तर पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) डगआउटमध्ये रडताना दिसला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा पहिला T20 विश्वचषक खेळला. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून या स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती. सुपर-12 मध्ये भारताने केवळ एक सामना गमावून उपांत्य फेरी गाठली होती. पण इथे इंग्लंडच्या शानदार खेळाने टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

तसेच, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाला पहिला धक्का केएल राहुलच्या रुपाने बसला, तो केवळ 5 धावा करु शकला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला, त्याला ख्रिस जॉर्डनने 27 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दुसरीकडे, आदिल रशीदने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) 14 धावांवर बाद करुन टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. भारताने 75 धावांवर तिसरी विकेट गमावली. यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. 50 धावा करुन कोहली जॉर्डनचा बळी ठरला. भारताने 136 धावांवर चौथी विकेट गमावली. तर हार्दिक पांड्या शेवटच्या चेंडूवर आऊट झाला, त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. हार्दिकच्या आधी पंतही धावबाद झाला.

शिवाय, इंग्लंडला लक्ष्याचा पाठलाग करताना कोणतीही अडचण आली नाही. 24 चेंडू बाकी असताना इंग्लंडने 170 धावा करुन सामना जिंकला. जोस बटलरने 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावांची नाबाद खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT