Roger Federer Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Roger Federer Retirement: रॉजर फेडररच्या नावे आहेत हे 10 मोठे विक्रम

Roger Federer: एटीपी क्रमवारीत सर्वाधिक काळ रॉजर फेडरर नंबर-1 टेनिसपटू होता. त्याने एकूण 237 आठवडे पहिले स्थान राखले.

दैनिक गोमन्तक

रॉजर फेडररने (Roger Federer) गुरुवारी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. 2018 सालापर्यंत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विक्रमांवर आपले नाव कायम ठेवणारा फेडरर गेल्या 4 वर्षांपासून दुखापतीमुळे खूपच त्रस्त होता. यामुळे तो आपला सर्वोत्तम खेळही दाखवू शकला नाही. दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक यश मिळवले आहे.

- रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली. या बाबतीत फक्त राफेल नदाल (22) आणि नोव्हाक जोकोविच (21) त्याच्या पुढे आहेत.

- रॉजर फेडररच्या नावावर 103 विजेतेपदांची नोंद आहे. टेनिसच्या ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा तो दुसरा खेळाडू आहे. जिमी कॉर्नर्स (109) पहिल्या क्रमांकावर आहे.

- फेडरर हा एकेरीतील सर्वाधिक सामना जिंकणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 1251 सामने जिंकले आहेत. येथे जिमी कॉर्नर्स (1274) अग्रस्थानी आहे.

- फेडरर सर्वाधिक काळ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला. तो एकूण 237 आठवडे पहिल्या स्थानावर राहिला.

- सर्वात वयस्कर खेळाडूचा नंबर-1 रँकिंगचा विक्रमही फेडररच्या नावावर आहे. वयाच्या 36 वर्षे 320 दिवसातही तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

- फेडररने आठ विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. कोणत्याही खेळाडूने जिंकलेली ही सर्वाधिक विजेतेपदे आहेत.

- फेडररने 2017 मध्ये वयाच्या 35 वर्षे 342 दिवसांत विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. असे करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

- सलग 10 ग्रँडस्लॅम फायनल खेळणारा फेडरर हा एकमेव खेळाडू आहे. 2005-06 मध्ये त्याने हा विक्रम केला होता.

- तीन कॅलेंडर वर्षात चारही ग्रँड स्लॅम फायनल खेळणारा रॉजर फेडरर हा एकमेव खेळाडू आहे. फेडररने 2006, 2007 आणि 2009 मध्ये ही कामगिरी केली होती.

- ग्रास कोर्टवर सर्वाधिक सलग सामने (65) जिंकण्याचा विक्रमही फेडररच्या नावावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT