Robin Uthappa
Robin Uthappa Dainik Gomantak
क्रीडा

Robin Uthappa Retirement: रॉबिन उथप्पाने घेतली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

दैनिक गोमन्तक

Robin Uthappa Retirement: काही दिवसांपूर्वीच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता टीम इंडिया आणि CSK चा दिग्गज फलंदाज रॉबिन उथप्पानेही क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

उथप्पाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भावनिक कॅप्शनसह निरोपाचे पत्र लिहिले आहे. आपल्या संदेशात उथप्पाने लिहिले की, "व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात करुन मला 20 वर्षे झाली आहेत. देशाचे आणि कर्नाटकचे (Karnataka) प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. तथापि, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे, आणि मनापासून, मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे."

दरम्यान, 11 नोव्हेंबर 1985 रोजी कुर्ग, कर्नाटक येथे जन्मलेल्या रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 2002 मध्ये पहिला सामना खेळला. तर 27 जानेवारी 2020 रोजी त्याने केरळसाठी शेवटचा सामना खेळला. रॉबिनने 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 934 धावा, 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 249 धावा आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (Cricket) 9446 धावा केल्या आहेत. T20 च्या सर्व फॉरमॅटमध्ये त्याने 7272 धावा केल्या आहेत. यासोबतच उथप्पाने यष्टिरक्षक म्हणूनही भूमिका निभावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT