Riyan Parag Dainik Gomantak
क्रीडा

Riyan Parag: रियान परागची बॅट तळपली! तब्बल 12 चौकार अन् 12 षटकारांसह असामला पोहचवले सेमीफायनलमध्ये

रियान परागने असामकडून सोमवारी जम्मू आणि काश्मीर विरुद्ध 174 धावांची खेळी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Riyan Parag: विजय हजारे ट्रॉफी 2022 या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत सोमवारी असाम विरुद्ध जम्मू आणि काश्मीर या संघात उपांत्यपूर्व सामना पार पडला. या सामन्यात असामने 7 विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. असामच्या विजयात रियान पराग आणि रिषव दास यांनी शतके झळकावत मोलाचा वाटा उचलला.

जम्मू आणि कश्मीर संघाने असाम समोर 351 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान असामने रियान आणि रिषव यांच्या शतकामुळे 46.1 षटकात सहज पूर्ण केले. रियानने 116 चेंडूत 12 चौकार आणि 12 षटकारांसह 174 धावांची खेळी केली. तसेच त्याने रिषवबरोबर 277 धावांची भागीदारीही रचली.

एका क्षणी असामने 45 धावांतच 2 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर रियान आणि रिषवने डाव सांभाळला आणि असामसाठी विजय सोपा केला. रिषवने 118 चेंडूत नाबाद 114 धावांची खेळी केली.

जम्मू आणि काश्मीरकडून मुजतबा युसूफ, औकीब नबी आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरकडून शुभम खजुरियाने 84 चेंडूत 120 धावांची आणि हेनान नाझीरने 113 चेंडूत 124 धावांची खेळी केली. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरला 50 षटकात 7 बाद 350 धावा करण्यात यश आले. या दोघांव्यतिरिक्त यष्टीरक्षक फाजील रशीदनेही 52 धावांची अर्धशतकी खेळी केलेली.

असामकडून अविनाव चौधरी आणि रज्जाकुद्दीन अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT