Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: कार चालवताना नशेत होता पंत? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

पंतच्या अपघाताबद्दल पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी कार अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला धोका नसल्याचे समजले आहे.

पंत दिल्लीवरून रुडकीला येत असताना नारसन बॉर्डरजवळ त्याचा अपघात झाला. त्याची कार डिव्हायडरला धडकली. पण पंत कारमधून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. कारण कारला नंतर आग लागून ती पूर्णपणे जळली.

दरम्यान, त्याच्या या अपघाताबद्दल विविध अंदाज व्यक्त होत होते. त्याला ओव्हरस्पिडींगची सवय असल्याचे म्हटले जात होते. पण आता त्याच्या अपघाताचा तपास उत्तराखंड पोलीस करत आहेत. पोलिसांनी माहिती दिली आहे की पंत कोणत्याही नशेत नव्हता आणि त्याच्या कारचा वेगही अधिक नव्हता.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांनी सांगितले की 'आम्ही उत्तर प्रदेश सीमेपासून नारसानमधील अपघाताचे ठिकाणापर्यंतचे 8 ते 10 स्पीड कॅमेरा तपासले आहेत. नॅशनल हायवेवर असलेली ताशी 80 किमी वेगमर्यादा पंतने ओलांडलेली नाही.'

'सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचा वेग अधिक वाटत आहेत कारण डिव्हायडरला धडकल्यानंतर कार हवेत उडाली होती. आमच्या टेक्निकल टीमने अपघाताच्या ठिकाणही तपासले. आम्हाला असा कोणताही पुरावा सापडलेला नाही, ज्यातून पंतने वेगात गाडी चालवल्याचे समजेल.'

तसेच अजय सिंग यांनी पुढे सांगितले की 'जर तो नशेत असता, तर त्याने 200 किमी दूर गाडी कशी चालवली असती, दिल्लीपासून इतक्या दूरपर्यंत त्याचा कोणताही अपघात झाला नाही. पंतला रुडकीमध्ये प्रथमोपचार देणाऱ्या डॉक्टरांनीही सांगितले की तो पूर्णपणे सामान्य स्थितीत होता. त्याचमुळे तो स्वत:ला कारमधून बाहेर काढू शकला. जो व्यक्ती नशेत असेल, तो स्वत:ला अशाप्रकारे बाहेर काढू शकला नसता.'

दरम्यान, असे म्हटले जात आहे की पंतला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार डिव्हायडरला धडकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Elevated Road: पर्वरीच्या असह्य वाहतूक कोंडीवर 'उन्नत' उतारा! 641 कोटींच्या सहापदरी मार्गाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन; शुक्रवारपासून वाहतूक सुरू

America Strikes Iranian Oil Tankers: युद्धनौकेवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा चोख बदला! अमेरिकेने उडवले इराणचे 5 महाकाय तेल टँकर्स; रिव्होल्यूशनरी गार्डचा गेम ओव्हर? VIDEO

Horoscope 9 September 2026: गणपती बाप्पाची 'या' राशींवर होणार कृपावृष्टी! 9 सप्टेंबरचं नक्षत्रांतर बदलणार तुमचं आयुष्य; नोकरदार आणि व्यापाऱ्यांसाठी सुवर्णयोग

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

SCROLL FOR NEXT