Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

DC vs LSG, IPL 2023: पंतची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांच्या उड्या, स्टेडियममध्ये पोहचताच...

DC vs LSG, IPL 2023: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे.

Manish Jadhav

DC vs LSG, IPL 2023: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यातच दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहण्यासाठी स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही स्टेडियममध्ये पोहोचला आहे.

पंत स्टेडियममध्ये दिसला

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) स्टेडियममध्ये उपस्थित आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) डगआउटमध्ये पंतची जर्सी दिसली होती. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला कर्णधार बनवण्यात आले आहे. पंतने आयपीएलच्या 98 सामन्यात 2838 धावा केल्या आहेत.

पंतच्या गाडीला अपघात झाला

गेल्या वर्षी ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून रुरकीला जाताना अपघात झाला होता. त्याची कार दुभाजकाला धडकली होती. त्यानंतर त्याच्या कारला आग लागली होती. पंत या अपघातात बचावला.

दरम्यान, पंतला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT