KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: ...म्हणून पंत ऐवजी पहिल्या वनडेत केएल राहुल 'यष्टीरक्षक'; BCCI ने दिले अपडेट

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात रविवारी होत असलेल्या पहिल्या वनडे सामन्यांत केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

Pranali Kodre

IND vs BAN: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात रविवारपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे. पण या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच बीसीसीआयने भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक ऋषभ पंतला वनडे संघातून मुक्त केले आहे.

बीसीसीआयच्या मेडिकल टीमबरोबर चर्चा केल्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याला न्यूझीलंड दौऱ्यात दुखापत झाली होती.

पण असे असले तरी पंत (Rishabh Pant) 14 डिसेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पुन्हा भारतीय संघात सामील होईल.

याशिवाय बीसीसीआयने वनडे मालिकेपूर्वी अशीही माहिती दिली की अक्षर पटेल (Axar Patel) पहिल्या सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, त्याच्या अनुपलब्धतेबद्दल कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.

त्याचबरोबर याच वनडे मालिकेतून मोहम्मद शमीही यापूर्वीच खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी उमरान मलिकला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही शमीच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. याचबरोबर रविंद्र जडेजाही सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्ण सावरेला नाही. त्यामुळे भारतीय संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करताना दिसतोय.

केएल राहुल करणार यष्टीरक्षण

आता बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पंत उपलब्ध नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या सामन्यासाठी केएल राहुल यष्टीरक्षण करेल असे जाहीर केले आहे. केएल राहुलने (KL Rahul) याआधीही भारतासाठी काही सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केले आहे.

भारताकडे पंत व्यतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून इशान किशनचा पर्याय होता. मात्र, भारताच्या वरच्या फळीत शिखर धवन, रोहित आणि विराट कोहली खेळणार असल्याने इशानला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नसल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT