Rishabh Pant Girlfriend Isha Negi Twitter
क्रीडा

इशा वहिनी DCचे नशीब घेऊन आली, ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचे युजर्सनी केले कौतूक

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी सध्या चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ती ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतसोबत दिसली.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) आणि बहीण साक्षी पंत हा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. (Rishabh Pant-Isha Negi)

सामना सुरू झाला तेव्हा टीव्ही स्क्रीनवर दोघींनाही फ्लॅश करण्यात आले. ईशा नेगी आणि साक्षी पंत स्टेडियममध्ये एकत्र बसून एकमेकांशी बोलत होत्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सला सुरुवातीला यश मिळाल्यावर दोघांनीही आनंदाने उड्या मारल्या आणि टाळ्या वाजवल्या.

ऋषभ पंत आणि ईशा नेगी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आणि त्यानी आपले प्रेम खुलेपणाने व्यक्तही केले आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा ईशा नेगीचा वाढदिवस होता, तेव्हा ऋषभने तिच्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर रिपोस्ट करताना ईशा नेगीनेही ऋषभ पंतला आय लव्ह यू म्हणून थॅक्यू म्हटले होते.

ईशा नेगीचा फोटो पडद्यावर येताच सोशल मीडियावरही व्हायरल झाला. चाहत्यांनी ट्विट करायला सुरुवात केली. काही युजर्सनी लिहिले की, आज वहिनी मॅच पाहायला आली आहे, तर काहींनी लिहिलं आहे की, वहिनी आली तर ती दिल्ली कॅपिटल्सचे नशीबही सोबत घेऊन आली अशा प्रकारच्या अनेक कमेंट युजर्सनी या फोटोवर केल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आत्तापर्यंत तीन सामने जिंकले आहेत आणि चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर सातत्याने विजय मिळवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT