Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: पंत कसोटीत 'सिक्सर किंग' बनण्याच्या मार्गावर! इतिहासात कोरलंय नाव

ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Rishabh Pant: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात चट्टोग्रामला सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा सामना बुधवारी सुरू झाला आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रथमदर्शनी भारताची या सामन्यात फारशी बरी सुरूवात झाली नाही. भारताने 50 धावांच्या आतच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

पण, अशा परिस्थितीत पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आक्रमक पवित्रा स्विकारत फटकेबाजी केली. यावेळी त्याने 45 चेंडूत 46 धावांची खेळी करताना 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताला सहज 100 धावांचा टप्पा पार करता आला.

याच खेळीदरम्यान त्याने कसोटीत 50 षटकार मारण्याचा टप्पाही पूर्ण केला. दरम्यान, तो कसोटीत सर्वात जलद 50 षटकार पूर्ण करणारा खेळाडू आहे. त्याने त्याचा 50 वा षटकार मेहदी हसनच्या चेंडूवर मारला. बांगलादेशविरुद्ध खेळत असलेला सामना पंतचा कारकिर्दीतील 32 वा सामना असून त्याने आत्तापर्यंत 54 डावात फलंदाजी केली आहे.

तसेच पंत कसोटीत 50 षटकार मारणारा चौथाच यष्टीरक्षक आहे. यापूर्वी ऍडम गिलख्रिस्ट, एमएस धोनी आणि ब्रॅड हॅडिन या यष्टीरक्षकांनी 50 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे यातील केवळ गिलख्रिस्टलाच 100 षटकार मारता आले आहेत. धोनीने 78 आणि हॅडिनने 54 षटकार मारले आहेत.

याशिवाय पंतने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4000 धावाही पूर्ण केल्या आहेत.

भारताची समाधानकारक सुरुवात

भारताने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेरपर्यंत 56 षटकांत 4 बाद 174 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली. पण ते खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर लगेचच बाद झाले. केएल राहुलने 22 धावा केल्या आणि शुभमनने 20 धावा केल्या.

तसेच विराट कोहलीही लगेचच बाद झाला. त्याला 1 धावेवर तैजुल इस्लामने बाद केले. तसेच नंतर पंतने चेतेश्वर पुजारासह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी 64 धावांची भागीदारीही केली. मात्र, पंत 46 धावांवर बाद झाला.

त्यानंतर आता श्रेयस अय्यर फलंदाजीला आला असून त्यानेही चांगली फलंदाजी करताना पुजारासह दुसऱ्या सत्राखेरपर्यंत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. दुसरे सत्र संपले, तेव्हा पुजारा 42 आणि श्रेयस 41 धावांवर खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT