Prithvi Shaw
Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघात कधी करणार वापसी?

दैनिक गोमन्तक

दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या विजेते पदाच्या शोधात सोमवारी पंजाब किंग्जवर 17 धावांनी शानदार विजय नोंदवला आणि आयपीएल 2022च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचले. दिल्लीचा 13 सामन्यांमधला हा 7 वा विजय असून संघ आता 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता त्याचा शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) होणार आहे, जो खूप महत्त्वाचा असेल. या संघाचा कर्णधार ऋषभ पंतला त्याचे सर्व खेळाडू तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असावेत, असे वाटते. (IPL 2022 Prithvi Shaw latest News)

युवा ओपनर 'पृथ्वी शॉ' (Prithvi Shaw) टायफॉइडवर उपचार घेतल्यानंतर सांघिक हॉटेलमध्ये परतला आहे. परंतु मैदानावर त्याच्या उतरण्याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) शॉच्या फिटनेसबाबत माहिती दिली.

22 वर्षीय सलामीवीर 'पृथ्वी शॉ' याला मे महिन्याच्या सुरुवातीला खूप ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टायफॉइडवर उपचार घेतल्यानंतर तो सध्या टीम हॉटेलमध्ये परतला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. पण, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

पंत म्हणाला, 'मला वाटते त्याचा खेळ 50/50 आहे. याबाबत काही दिवसांतच आपल्याला माहिती मिळेल.' शॉच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरसह पंतने केएस भरतचा सलामीवीर म्हणून प्रयत्न केला, पण हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. पंजाबविरुद्धच्या सामन्यात सरफराज खानने डावाची सुरुवात केली आणि 16 चेंडूत 32 धावांची शानदार खेळी खेळली. शॉने मॅच फिटनेस गाठला तर तो सलामीवीर म्हणून खेळेल.

पंजाबविरुद्धच्या विजयानंतर पंत म्हणाला, 'संपूर्ण स्पर्धेत आम्ही एक सामना हरलो, एक जिंकलो. हे असे काहीतरी आहे जे आम्हाला एक संघ म्हणून बदलायचे होते आणि आम्ही यशस्वी झालो. मिचेल मार्शच्या (63) शानदार खेळीमुळे दिल्लीने 20 षटकांत 7 गडी गमावून 159 धावा केल्या, त्यानंतर पंजाब संघाला 9 विकेट गमावून 142 धावा करता आल्या. दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, त्याने 36 धावांत 4 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

SCROLL FOR NEXT