Virat Kohli | Royal Challengers Bangalore | RCB Dainik Gomantak
क्रीडा

RCB: मनं जिंकण्यात विराटची आरसीबीच टॉप, रियल मद्रिद अन् बार्सिलोनाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर मोठा विक्रम झाला असून त्यांनी रियल मद्रिद, बार्सिलोना सारख्या संघांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग जगभरातील लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. त्यातही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आपीएल संघाने विजेतेपद जिंकले नसले, तरी या संघाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे आरसीबीच्या नावावर एक विक्रमही झाला आहे.

आरसीबी हा इंस्टाग्रामवरील 2022 वर्षातील सर्वात लोकप्रिय पाच संघांमध्ये आला आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर सर्वाधिक इंटरॅक्शन मिळालेल्या पहिल्या पाच संघांमध्ये असलेला आरसीबी एकमेव भारतीय संघ आहे. पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आरसीबीव्यतिरिक्त अन्य चार फुटबॉल संघ आहेत.

एका सोशल मीडिया ऍनालिटिक्स कंपनीने केलेल्या प्रायव्हेट सर्व्हेनुसार आरसीबीला 948 दशलक्ष इंटरॅक्शन्स आले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर 2.09 अब्ज इंटरॅक्शन्ससह रियल मद्रिद अव्वल क्रमांकावर आहे. तसेच एफसी बार्सिलोना 1.78 अब्ज इंटरॅक्शन्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅचेस्टर युनायटेडला 1.41 अब्ज इंटरॅक्शन्स आले आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर पॅरिस सेंट-जर्मेन असून त्यांना 1.07 अब्ज इंटरॅक्शन्स आले आहेत. या चार संघांनंतर आरसीबी पाचव्या क्रमांकावर आहे.

आरसीबी आयपीएलचा पहिल्या हंगामापासून म्हणजेच 2008 पासून भाग आहे. आरसीबीकडून आत्तापर्यंत विराट कोहलीसह एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, युजवेंद्र चहल, शेन वॉटसन, ब्रेंडन मॅक्युलम असे अनेक दिग्गज खेळले आहेत. त्यामुळे हा संघ लोकप्रिय संघांपैकी एक आहे.

(RCB in top five Sports teams with the most Instagram interactions in the year 2022)

महत्त्वाचे म्हणजे या संघाचे बरीच वर्षे विराट कोहलीने नेतृत्व केले होते. विराट हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असेलेला तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याला इंस्टाग्रामवर 234 दशलक्ष फोलोवर्स आहेत. त्यामुळे त्याच्या या फॅन फॉलोविंगचाही आरसीबीला फायदा झाला आहे.

विराट आरसीबीचा गेल्या 16 वर्षांपासून म्हणजेच अगदी पहिल्या हंगामापासून भाग आहे. तसेच तो तब्बल 16 वर्षे एकाच आयपीएल संघाचा भाग असलेला एकमेव खेळाडू आहे.

आता आरसीबीचा महिला संघही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. महिला आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या पाच संघांपैकी एक संघ आरसीबीचाही आहे. याबद्दलही विराटने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT