RCB Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: सलग पाच पराभवानंतरही RCB करू शकते प्लेऑफसाठी क्वालिफाय, कसं ते घ्या जाणून

वूमन्स प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सलग 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफसाठी त्यांचे समीकरण कसे असेल, याबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore: वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी अतिशय वाईट ठरली आहे. आत्तापर्यंत या संघाने 5 सामने खेळले असून एकाही सामन्यात बेंगलोरला विजय मिळवता आलेला नाही. बेंगलोरने 13 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्विकारला. हा संघाचा पाचवा पराभव होता.

त्यामुळे आता बेंगलोर संघाच्या प्लेऑफच्या आशांना जोरदार धक्का बसला आहे. पण असे असले तरी अद्याप त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपलेले नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे डब्ल्यूपीएलमध्ये केवळ तीन संघच प्लेऑफमध्ये जाणार आहेत. साखळी फेरीतील सर्व सामन्यांनंतर गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावरील संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघाला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल. एलिमिनेटमध्ये विजय मिळणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ असेल.

वूमन्स प्रीमियर लीग गुणतालिका (13 मार्च 2023 पर्यंत)

WPL Points Table

दरम्यान, बेंगलोरच्या समीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास बेंगलोर गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकावर पोहचू शकत नाही, कारण मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी 4 सामने जिंकलेले असल्याने त्यांनी आधीच 8 गुण मिळवलेले आहेत आणि बेंगलोरने पुढील तिन्ही सामने जिंकले तरी ते 8 गुणांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची स्पर्धा सध्या अन्य दोन संघ म्हणजेच युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स विरुद्ध असेल.

सध्या युपी वॉरियर्स सध्या 4 गुणांसह तिसऱ्या आणि गुजरात 2 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, बेंगलोरला स्पर्धेत कायम राहायचे असेल, तर आधी ही काळजी घ्यावी लागेल की ते आगामी तिन्ही सामने पराभूत होणार नाही. बेंगलोरला युपीविरुद्ध 15 मार्चला, गुजरातविरुद्ध 18 मार्चला आणि मुंबईविरुद्ध 21 मार्चला सामने खेळायचे आहेत.

याबरोबरच बेंगलोरला आशा करावी लागेल की युपीने त्यांचे उर्वरित सर्व सामने पराभूत व्हावे. तसेच त्यांना अशीही आशा बाळगावी लागेल की गुजरातही त्यांच्या उर्वरित सामन्यांमधील एकापेक्षा अधिक सामने जिंकणार नाही. कारण आरसीबीचे या संघाच्याइतकेच गुण जरी झाले तरी त्यांचा नेटरनरेट कमी असल्याने ते गुणतालिकेत या दोन्ही संघांच्या खाली राहतील.

आता पुढील सामन्यांमध्ये बेंगलोर कशी कामगिरी करणार हे पाहावे लागेल. तसेच हेही लक्षात घेणे महत्त्वाचे राहिल की जर बेंगलोर पुढील तीन सामन्यांपैकी एकही सामना पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान जवळपास पूर्ण संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT