Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja Injury: टीम इंडियाला मोठा झटका, रवींद्र जडेजा पहिल्या दोन वनडेतून आउट

Ravindra Jadeja Ruled Out: वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

India vs West Indies: वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरेतर, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खरेतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा पहिल्या दोन वनडेतून बाहेर पडला आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सांगितले की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा भाग असणार नाही. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने ट्विट केले की, "टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे."

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, शिखर धवन (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रणंद कृष्णा.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शामर ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (क), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जॅडन सील्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT