MS Dhoni and Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IPL: पडदा उठला! CSK कॅप्टन्सीवरून नाराज झालेला जडेजा, मग कामी आला कॅप्टनकूलचा फंडा

IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनीवरून रविंद्र जडेजा नाराज झाला होता, पण हा वाद कसा मिटला, याबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Ravindra Jadeja Relation with CSK: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) लोकप्रिय संघांपैकी एक आहे. सीएसकेने आत्तापर्यंत मोठे यश एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहे. सीएसकेने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामात धोनीने सीएसकेचे नेतृत्व करताना चारवेळा आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले.

पण गेल्यावर्षी म्हणजे आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाकडे सोपवले. मात्र, सुरुवातीपासूनच त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेची कामगिरी खालावली आणि जडेजाचे वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यानंतर त्याने पहिल्या 8 सामन्यांनंतर त्याने या नेतृत्वपदाचा त्याग करत पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले.

या सर्व घटनांदरम्यान जडेजा आणि सीएसके फ्रँचायझीमध्ये दरी निर्माण झाली होती. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार जडेजाने हॉटेल रूमही सोडली होती. तो त्या हंगामातील अखेरचे काही सामने दुखापतीमुळे खेळला नव्हता.

त्यावेळी अनेक रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आलेले की त्याला त्यावेळी निर्माण झालेल्या वादामुळे खेळायचे नव्हते. इतकेच नाही, तर अशीही चर्चा रंगली होती की आयपीएल 2023 पूर्वी जडेजाला सीएसके संघ मुक्त करेल. पण तसे काहीही झाले नाही. अखेर सीएसकेचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार धोनीने मध्यस्थी केली.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयपीएल 2023 पूर्वी धोनीने जडेजाबरोबर समोरा-समोर दीर्घकाळ चर्चा केली. त्यामुळे जडेजा आणि सीएसके यांच्यातील संबंध सुधारण्यात मदत झाली. जडेजाने सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांच्याबरोबर देखील संवाद साधला. त्यामुळे गैरसमज दूर झाले.

तसेच रिपोर्टनुसार जडेजा सीएसकेवर दोन कारणांमुळे नाराज होता. एक म्हणजे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेणे आणि दुसरे म्हणजे नेतृत्वाच्या दबावाचा परिणाम त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर पडत होता. तथापि, नंतर जडेजालाही सर्व समजावून सांगण्यात आले आणि त्यानेही संघाबरोबर पुढे जाण्याची तयारी दाखवली.

जडेजाने गेल्यावर्षी आयपीएलमध्ये 10 सामने खेळले होते, ज्यात त्याने 119 धावा केल्या होत्या आणि 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्या हंगामात सीएसके 10 संघांमध्ये 9व्या क्रमांकावर राहिले होते.

दरम्यान, जडेजा काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2023 स्पर्धेसाठी सीएसकेशी जोडला गेला असून त्याने तयारीलाही सुरुवात केली आहे. आयपीएल 2023 मध्ये सीएसकेला पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळायचा आहे. हा या हंगामातील सलामीचा सामना असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT