Ravindra Jadeja X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: जडेजाची बॅटिंगच नाही, तर बॉलिंगमध्येही कमाल; स्टोक्सला बाद करत दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja Record: रविंद्र जडेजाने राजकोट कसोटीत बेन स्टोक्सला बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test at Rajkot, Ravindra Jadeja Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान रविंद्र जडेजाने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात जडेजाने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि टॉम हर्टली यांना बाद केले. यासह जडेजाने कसोटीत भारतामध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. स्टोक्स जडेजाचा 200 वी विकेट ठरला.

तो भारतामध्ये 200 विकेट्स घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे, आर अश्विन, हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी असा कारनामा केला आहे.

याशिवाय जडेजाने भारतात फलंदाजी करताना 1793 धावाही केल्या आहेत. त्यामुळे तो भारतात कसोटीमध्ये 1500 पेक्षा अधिक धावा आणि 200 विकेट्स घेणारा कपिल देव आणि आर अश्विन यांच्यानंतरचा तिसराच खेळाडू आहे.

कपिल देव यांनी भारतात 65 कसोटीत खेळताना 2810 धावा केल्या आहेत, तर 219 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आर अश्विनने 58 कसोटी सामने भारतात खेळताना 1823 आणि 347 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 350 विकेट्स - अनिल कुंबळे (63 सामने)

  • 347 विकेट्स - आर अश्विन (58 सामने)

  • 265 विकेट्स - हरभजन सिंग (55 सामने)

  • 219 विकेट्स - कपिल देव (65 सामने)

  • 201 विकेट्स - रविंद्र जडेजा (42 सामने)*

जडेजाने 3000 धावाही केल्यात पूर्ण

दरम्यान, या कसोटीत फलंदाजी करताना जडेजाने पहिल्या डावात 112 धावांची शतकी खेळी केली होती. त्याखेळीसह त्याने 3000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे तो कसोटीत 3000 धावा आणि 250 विकेट्स घेणारा भारताचा कपिल देव आणि आर अश्विन यांच्यानंतरचा तिसराच खेळाडू होता.

कपिल देव यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 131 सामन्यांत 434 धावा घेतल्या असून 5248 धावा केल्या आहेत. तसेच आर अश्विनने कसोटी कारकिर्दीत 98 सामन्यांत 500 विकेट्स आणि 3308 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जडेजाने कसोटीत 70 कसोटीत 282 विकेट्स घेतल्या आहेत आणि 3005 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT