Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Arjun Tendulkar: पुन्हा चमकला अर्जुन; फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवले कौशल्य

गोमन्तक डिजिटल टीम

Arjun Tendulkar: गोलंदाजांनी प्रभावी मारा केल्यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला सेनादलाचा पहिला डाव 175 धावांत गुंडाळणे शक्य झाले. चार दिवसीय सामन्याला मंगळवारी पालम-नवी दिल्ली येथील एअरफोर्स मैदानावर सुरवात झाली.

गोव्यातर्फे पुनरागमन करणारा मध्यमगती विजेश प्रभुदेसाई याने तीन गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकरनेही दाहक गोलंदाजी करताना सकाळच्या सत्रात दोघांना माघारी धाडले. बाकी गोलंदाजांनीही योगदान देताना प्रत्येकी एक गडी टिपला.

सेनादलातर्फे सातव्या क्रमांकावरील पुलकित नारंग याने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 91 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार मारले. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने सलामीच्या ईशान गडेकर (1) याला गमावून 36 धावा केल्या.

मंथन खुटकर (18) व सुयश प्रभुदेसाई (17) दुसऱ्या विकेटसाठी 31 धावांची अभेद्य भागीदारी केली. गोव्याचा संघ अजून 139 धावांनी मागे आहे. यजमान संघाची घसरगुंडी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सेनादलावरच उलटला.

गोव्याच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना सावरू दिले नाही. डावातील तिसऱ्याच षटकात शुभमन रोहिल्ला धावबाद झाल्यानंतर सेनादलाचे गडी ठराविक अंतराने बाद होत गेले.

लक्षय गर्ग, अर्जुन तेंडुलकर व सुयश प्रभुदेसाई यांनी उपाहाराच्या ठोक्याला सेनादलाची स्थिती 5 बाद 73 अशी स्थिती केली.

उपाहारानंतर लवकेश बन्सल व पुलकित नारंग यांनी सेनादलास सावरण्यावर भर दिला. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून संघाला शतक ओलांडून दिले. लवकेश याला मोहित रेडकरने बाद केले.

चहापानापर्यंतच्या खेळात सेनादलाने टिच्चून फलंदाजी केली आणि 83 धावांत दोनच गडी बाद केले. चहापानानंतरच्या पाचव्या चेंडूवर विजेश प्रभुदेसाई याने पुलकितला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर सेनादलाच्या द्विशतकी धावसंख्येच्या आशा संपुष्टात आल्या.

संक्षिप्त धावफलक

सेनादल, पहिला डाव 59.2 षटकांत सर्वबाद 175 (राहुलसिंग गहलौत 13, रजत पालिवाल 26, लवकेश बन्सल 32, पुलकित नारंग 52, मोहित राठी 10, पूनम पुनिया 11, दिवेश पठाणिया नाबाद 15, लक्षय गर्ग 11-4-26-1, अर्जुन तेंडुलकर 13-3-27-2, विजेश प्रभुदेसाई 16.2-4-39-3, सुयश प्रभुदेसाई 3-0-16-1, मोहित रेडकर 8-1-32-1, दर्शन मिसाळ 8-0-34-1).

गोवा, पहिला डाव 18 षटकांत 1 बाद 36 (ईशान गडेकर 1, मंथन खुटकर नाबाद 18, सुयश प्रभुदेसाई नाबाद 17, पूनम पुनिया 1-8).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT