Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेपॉकवर संदीप शर्मानं रोखलं जड्डू-माहीचं वादळ! राजस्थानने मारली बाजी

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 17 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव करुन एक रोमांचक सामना जिंकला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 17 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या.

प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संघ डेव्हॉन कॉनवेच्या अर्धशतकानंतरही 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 172 धावाच करु शकला.

यासह चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करणारा मुंबई इंडियन्सनंतर राजस्थान रॉयल्स हा दुसरा संघ ठरला आहे.

राजस्थानने 175 धावा केल्या

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. जैस्वाल 10 धावा करुन बाद झाला.

यानंतर देवदत्त पडिक्कल आणि बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. देवदत्त 26 चेंडूत 38 धावा करुन बाद झाला.

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 9 व्या षटकात दोन बळी घेतले. पडिक्कलनंतर त्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.

यानंतर, अश्विन 22 चेंडूत 30 धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने 33 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केल्या. तो 52 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर शिमरॉन हेटमायरने 18 चेंडूत 30 धावा केल्या.

दुसरीकडे, राजस्थानच्या 175 धावांना प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही.

तिसऱ्या षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाड 8 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रहाणे 19 चेंडूत 31 धावा करुन बाद झाला. शिवमने 8 धावा केल्या.

यानंतर, मोईन अली, अंबाती आणि डेव्हॉन कॉनवे सात चेंडूंच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. कॉनवे अर्धशतक झळकावून बाद झाला.

शेवटच्या षटकात जडेजा आणि धोनीने मोठे फटके मारत संघाला विजयाच्या जवळ आणले. शेवटच्या दोन षटकात संघाला विजयासाठी 40 धावांची गरज होती.

संघाने 19 व्या षटकात 19 धावा केल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज होती. मात्र चेन्नईचा संघ शेवटच्या षटकात केवळ 17 धावाच करु शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT