Jos Buttler and Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

Jos Buttler: बटलरला महागात पडली रनआऊट नंतरची 'ती' चूक? BCCI ने केली मोठी कारवाई

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चूकीमुळे बीसीसीआयने जोस बटलरवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Pranali Kodre

Jos Buttler fined: गुरुवारी (11 मे) राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी राजस्थानचा स्टार सलामीवीर जोस बटलरविरुद्ध बीसीसीआयने कारवाई केली आहे.

आयपीएलने प्रसिद्धी पत्रक जाहीर करत बटलरवरील कारवाईबाबत माहिती दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार बटलरला आचार संहितेतील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामनाशुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच पुढे माहिती दिली आहे की 'बटलरने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक झाली असल्याचे मान्य केले आहे. लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यानंतर सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.'

दरम्यान, प्रसिद्धी पत्रकात बटलरकडून काय चूक झाली, याबद्दल स्पष्ट माहिती दिली नाही. तरी आचार संहितेतील कलम 2.2 सामन्यादरम्यान क्रिकेटच्या साहित्याचे, कपड्यांचे, मैदानातील सुविधांचे किंवा उपकरणांचे नुकसानाबद्दल आहे.

त्यामुळे असा कयास लावला जात आहे की तो जेव्हा धावबाद झाला, तेव्हा त्याने परत माघारी जाताना बॅट रागानं आपटली होती. त्याचमुळे त्याच्यावर ही कारवाई झाली असू शकते.

झाले असे की कोलकाताने 150 धावांचे आव्हान राजस्थानसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करतान यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हे राजस्थानकडून सलामीला फलंदाजीला आले होते.

त्यावेळी जयस्वालने पहिल्याच षटकात 26 धावा ठोकत दमदार सुरुवात केली होती. पण दुसऱ्या षटकात चौथ्या चेंडूवर बटलरने खेळलेल्या शॉटवर एकेरी धाव धावताना त्याच्यात आणि जयस्वालमध्ये गोंधळ झाला आणि परिणामी बटलरने त्याची विकेट गमावली. त्यामुळे बटलरला शुन्यावरच धावबाद होऊन माघारी जावे लागले. यावेळ परत जाताना तो चिडलेला होता.

दरम्यान, बटलरने विकेट लवकर गमावली असली तरी, जयस्वालने संजू सॅमसनच्या साथीने डाव पुढे नेत केवळ 13.1 षटकात राजस्थानला 150 धावांचे आव्हान पूर्ण करून दिले. जयस्वाल आणि सॅमसन यांच्यात नाबाद 121 धावांची भागीदारी झाली.

जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने 13 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाजही ठरला. तसेच सॅमसन 29 चेंडूत 48 धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी कोलकाताने या सामन्यान प्रथम फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरच्या 57 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 149 धावा उभारल्या होत्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT