R Ashwin Daughter Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: कधी हसू, कधी रडू! अश्विनला बॅटिंग करताना पाहून लेकीच्या भावना अनावर

IPL 2023: आर अश्विन फलंदाजी करत असताना त्याच्या 6 वर्षीय मुलीच्या भावना दाखवणारा एक गोड व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Pranali Kodre

R Ashwin Daughter Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवण्यात आले. या दिवसातील दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने 3 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून फलंदाजी करताना आर अश्विन 3 चेंडून एक चौकार आणि एक षटकार मारून 10 धावांवर बाद झाला. दरम्यान, त्याच्या फलंदाजीदरम्यानचा त्याच्या मुलीच्या भावना दाखवणारा एक गोड व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यात राजस्थानने 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल (1) आणि जोस बटलर (0) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळताना 32 चेंडूत 60 धावा केल्या. त्याला शिमरॉन हेटमायरने चांगली साथ दिली.

पण सॅमसन बाद झाल्यानंतरही हेटमायर आणि ध्रुव जुरेलने डाव सांभाळत होते. मात्र जुरेल 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 18 धावांवर बाद झाला. त्यामुळे आर अश्विन फलंदाजीला आला. त्यावेळी राजस्थानला 17 धावांची गरज होती.

पण अश्विनने फलंदाजीला आल्यानंतर पहिलाच चेंडू खेळताना चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र, तिसरा चेंडू खेळताना तो बाद झाला. अखेर शिमरॉन हेटमायरने 20 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर षटकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली.

अश्विनच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, अश्विन फलंदाजी करत असताना त्याच्या मुलीच्या भावना दाखवणारा व्हिडिओ त्याची पत्नी प्रीती नारायणन हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसते की जेव्हा अश्विनने मोठे फटके खेळले तेव्हा त्याची 6 वर्षांची मुलगी आध्या खूप खूश होती. मात्र तो बाद झाल्यानंतर तिला रडू कोसळले. आध्याचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राजस्थानने गुजरात 177 धावांवर रोखले

या सामन्यात गुजरातकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 45 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर आणि साई सुदर्शन यांनीही 20 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे गुजरातला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 177 धावा करता आल्या.

राजस्थानकडून संदीप शर्माने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्याचा कायापालट होणार! राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्राकडून 1880 कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

SCROLL FOR NEXT