IND vs NED| Weather Updates Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NED: नेदरलँडविरुद्ध भारत करणार अंतिम फेरित तिकीट निश्चित?

T20 World Cup 2022: भारत आणि नेदरलँड यांच्यात आज ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सामना रंगणार आहे.

दैनिक गोमन्तक

आज टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) पुन्हा एकदा टीम इंडिया नेदरलँड्सच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. या सामन्यावेळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याच्या ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात, तसंच अधिक पाऊस असल्यास सामना रद्दही केला जाऊ शकतो. काल पावसामुळे ग्रुप 1 मध्ये मोठा उलटफेर झाला. आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला.

पावसाने सामना रद्द झाल्यास काय?

टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील.

कसे आहेत दोन्ही संघ?

टिम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :

मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

नेदरलँड्सची टिम

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगटेन , स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, ब्रॅंडन ग्लोव्हर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT