Rahul Tripathi T20I debut Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: प्रतिक्षा संपली! घरच्याच मैदानावर राहुल त्रिपाठीचं पदार्पण, असं राहिलंय आजपर्यंतचं करिअर

राहुल त्रिपाठीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातून पदार्पण केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Rahul Tripathi: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे होत आहे. या सामन्यातून राहुल त्रिपाठीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे.

31 वर्षीय राहुल त्रिपाठी भारताकडून टी20 सामना खेळणारा 102 वा खेळाडू ठरला आहे, तर भारताकडून एकूणच आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 392 वा खेळाडू ठरला आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या हस्ते देण्यात आली.

विशेष गोष्ट अशी की देशांतर्गत क्रिकेट महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या त्रिपाठीने क्रिकेटचे धडे पुण्यात गिरवले आहेत. त्यामुळे गहुंजेमधील स्टेडियम त्याचे घरचे मैदान आहे. त्याला त्याच्या घरच्याच मैदानावर पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

त्रिपाठीला यापूर्वीही अनेकदा भारतीय संघात संधी मिळाली, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नव्हते. मात्र संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला आणि त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली.

त्रिपाठीकडे शॉट्सची विविधता आहे. त्याने यापूर्वी अनेकदा त्याच्या संघांसाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याने महाराष्ट्र संघाचेही नेतृत्व केले आहे. तो गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग तीन शतकेही झळकावली होती.

त्रिपाठीची आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी

त्रिपाठीने आयपीएलमध्ये 2017 साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पदार्पण केले होते. या हंगामात त्याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्षही वेधले होते. त्यानंतरही त्याने आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळायला हवी अशी चर्चाही सातत्याने होत होती. अखेर बराच काळ वाट पाहिल्यानंतर त्याने पदार्पण केले आहे.

त्रिपाठीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद अशा संघांकडून सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळले असून 1798 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्रिपाठीला देशांतर्गत क्रिकेटचाही मोठा अनुभव आहे. त्याने 52 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 2728 धावा केल्या आहेत. यात 7 शतकांचाही समावेश आहे. तसेच त्याने 53 लिस्ट ए सामने खेळले असून ४ शतकांसह 1782 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 125 टी20 सामन्यांमध्ये 2801 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT