Rahul Dravid-Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final 
क्रीडा

World Cup 2023: 'निराश अन् हताश...', राहुल द्रविडने पराभवानंतरच्या सांगितल्या भावना

Rahul Dravid: वर्ल्डकप 2023 पराभवानंतर भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय संघाच्या भावनांबद्दल आणि त्याच्या कार्यकाळाबद्दलही भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Rahul Dravid opened up on India's defeat against Australia in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (19 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडू अत्यंत निराश झाले होते. याबद्दल राहुल द्रविडने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

द्रविड म्हणाला, 'रोहित निराश होता, त्याच्याबरोबरच संघातील इतर खेळाडूही दु:खी होते. ड्रेसिंग रुममध्ये खूप भावूक वातावरण झाले होते.'

'प्रशिक्षक म्हणून हे पाहाणे खूप कठीण होते, कारम मला माहित आहे, या खेळाडूंनी किती मेहनत केली आहे, त्यांनी त्यासाठी किती त्याग केला आहे. त्यांना पाहाणे कठीण होते कारण तुम्ही या खेळाडूंना वैयक्तिकरित्या ओळखता. ते घेत असलेली मेहनत पाहाता.'

तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल द्रविड म्हणाला, 'तो शानदार कर्णधार आहे. त्याने या संघाचे खूप चांगले नेतृत्व केले. त्याने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसाठी खूप उर्जा आणि वेळ दिला आहे. तो कोणत्याही चर्चेसाठी नेहमीच तयार असतो. कधीकधी खुप योजना कराव्या लागतात, पण तो त्या सर्व गोष्टींसाठी वचनबद्ध असतो. त्याने या वर्ल्डकप मोहिमेसाठी त्याचा स्वत:चा वेळ आणि उर्जा दिली होती.'

तसेच सामन्याबद्दल द्रविड म्हणाला, 'आम्ही या वर्ल्डकपमध्ये सर्वकाही दिले. पण स्पर्धेच्या शेवटच्या क्षणी आमच्यासाठी चांगला सामना राहिला नाही. आज खेळाडूंलाठी वाईट दिवस होता. ज्याप्रकारचे दर्जेदार क्रिकेट खेळले, त्याबद्दल संघाचा अभिमान वाटत आहे. आमच्यासाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिली.

तसेच द्रविडने असेही म्हटले की या सामन्यात 280-290 धावा भारताकडून व्हायला हव्या होत्या. त्याचबरोबर दुपारपेक्षा संध्याकाळी चेंडू बॅटवर चांगला येत होता.

या वर्ल्डकपनंतर द्रविड आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांचा कार्यकाळही संपला आहे. पण आता त्यांचा करार पुढेही वाढवला जाणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दलही द्रविडला विचारण्यात आले.

त्यावर द्रविड म्हणाला, 'खरं सांगायचं, तर मी अद्याप याबद्दल विचार केलेला नाही. मी आत्ता फक्त या स्पर्धेचा विचार केलेला. आमची सगळी उर्जा या सामन्यावर केंद्रीत होती. मी अजून त्यावर विचार केलेला नाही. माझ्या भविष्याबद्दल अद्याप काही योजना नाहीत.'

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT