Rahkeem Cornwall  Dainik Gomantak
क्रीडा

Rahkeem Cornwall: 140 किलो वजनाच्या क्रिकेटरची बॅटिंगही दमदार, तब्बल 12 षटकारांसह ठोकली सेंच्युरी

Rahkeem Cornwall: जवळपास 140 किलो वजनाच्या राहकिम कॉर्नवॉलने 12 षटकारांसह शतक केले.

Pranali Kodre

Rahkeem Cornwall 1st T20 Century with 12 Sixes in CPL:

वेस्ट इंडिजमध्ये सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स संघात सामना झाला. या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सकडून राहकिम कॉर्नवॉलने शानदार शकर ठोकले.

राजस्थान रॉयल्सचीच फ्रँचायझी असलेल्या बार्बाडोस रॉयल्ससमोर सेंट किट्सने २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जवळपास १४० किलो वजन असलेल्या राहकिम कॉर्नवॉलने १०२ धावांची खेळी केली.

कॉर्नवॉलने ४५ चेंडूत त्याचे तुफानी शतक पूर्ण केले होते. पण नंतर तो रियायर्ड हर्ट झाला. कॉर्नवॉलचे हे टी२० कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले.

कॉर्नवॉलने ४८ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि तब्बल १२ षटकार मारले. म्हणजेच तब्बल ८८ धावा त्याने बाउंड्रीच्या रुपात वसूल केल्या.

तो तुफानी फटकेबाजी करत असताना त्याला दुसऱ्या बाजूने लॉरी इव्हान आणि कर्णधार रोवमन पॉवेलने दिली. या दोघांबरोबरही त्याच्या अर्धशतकी भागीदारी झाली.

त्यामुळे बार्बाडोसने २२१ धावांचे आव्हान १८.१ षटकातच केवळ २ विकेट्स गमावत पूर्ण केले. लॉरी इव्हानने १४ चेंडूत २४ धावांची खेळी केली. तसेच पॉवेलने २६ चेंडूत ४९ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेंट किट्सचीही फलंदाजी चांगली झाली. सेंट किट्सकडून यष्टीरक्षक फलंदाज आंद्रे फ्लेचर, विल स्मिद आणि कर्णधार शेरफेन रुदरफोर्ड यांनी अर्धशतके केली.

फ्लेचरने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या, तर स्मिदने ३६ चेंडूत ६३ धावा केल्या. तसेच रुदरफोर्डने २७ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. त्यामुळे सेंट किट्सने २० षटकात ४ बाद २२० धावा उभारल्या.

दरम्यान, गोलंदाजीतही कॉर्नवॉलची कामगिरी चमकदार राहिली. त्याने ३ षटकात २७ धावात २ विकेट्स घेतल्या. तसेच कार्लोस ब्रेथवेटने १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT