R Ashwin | Nathan Lyon X/ICC
क्रीडा

R Ashwin: 'दिग्गज...! अभिनंदन मित्रा', प्रतिस्पर्धी लायनला 500 विकेट्सबद्दल अश्विनच्या स्पेशल शुभेच्छा

Nathan Lyon: नॅथन लायनने नुकतेच 500 कसोटी विकेट्स घेतले, त्याबद्दल आर अश्विनने त्याच्यासाठी स्पेशल ट्वीट केले आहे.

Pranali Kodre

R Ashwin Congratulate Nathan Lyon for 500 Test Wickets:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी तब्बल 360 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

लायनने या सामन्यात पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट्स असे मिळून 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे लायनने कसोटी कारकिर्दीत 500 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याबद्दल त्याचे क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विननेही त्याचे कौतुक केले आहे.

अश्विनने त्याला GOAT (दिग्गज) म्हणत ट्वीट केले आहे की '५०० कसोटी विकेट्स घेणारा ९ गोलंदाज आणि केवळ दुसराच ऑफ स्पिनर. नॅथन लायन, मित्रा, अभिनंदन.'

दरम्यान, नॅथन लायन कसोटीत 500 विकेट्स घेणारा एकूण आठवाच गोलंदाज ठरला आहे, तर तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

यापूर्वी मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708), जेम्स अँडरसन (690), अनिल कुंबळे (619), स्टुअर्ट ब्रॉड (604), ग्लेन मॅकग्रा (563 विकेट्स) आणि कर्टनी वॉल्श (519) यांनी कसोटीत ५०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. यातील केवळ मुरलीधरनच ऑफ स्पिनर आहे.

अश्विन - लायनची मैत्री

खरंतर अश्विन आणि लायन एकमेकांचे मैदानात कट्टर प्रतिस्पर्धीही आहेत. मात्र, मैदानाबाहेर त्यांच्यात चांगली मैत्री आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्यांचे एक डील झाले आहे की कारकिर्द संपल्यानंतर सिडनी आणि चेन्नईमध्ये दोघे जण बसून पार्टीचा प्लॅन करून कारकिर्दीबद्दल चर्चा करतील.

लायनची कसोटी कारकिर्द

नॅथन लायनच्या नावावर आता 123 कसोटीत 501 विकेट्स झाल्या आहेत. त्याने कसोटी कारकर्दीत 23 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्ता विकेट्स घेतल्या आहेत, तर 4 वेळा त्याने एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT