R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अश्विन, इतका मोठा रेकॉर्ड करणारा...

R Ashwin: भारताचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Manish Jadhav

IND vs WI, 2nd Test: भारताचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन एवढा मोठा विक्रम करेल, जो आतापर्यंत फक्त अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे भारतासाठी करु शकला आहे.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 20 जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.

अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

भारताचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 14 विकेट घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण करण्याचा विक्रम करेल. अश्विनने डॉमिनिका कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करताना वेस्ट इंडिजविरुद्ध 12 विकेट घेतल्या होत्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यातही हा ऑफस्पिनर विंडीजच्या फलंदाजांसाठी काळ ठरु शकतो. त्रिनिदादची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल. अशा स्थितीत त्रिनिदादच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन 14 बळी मिळवू शकतो.

दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनने भारताकडून आतापर्यंत 93 कसोटी सामन्यांमध्ये 486 बळी घेतले आहेत. त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 14 बळी घेत हा ऑफस्पिन गोलंदाज 500 कसोटी बळींचा आकडा पूर्ण करुन इतिहास रचणार आहे.

केवळ अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेने (Anil Kumble) भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत.

इतका मोठा विक्रम करणारा भारताचा दुसरा गोलंदाज असेल

अश्विनने 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्यास कुंबळेनंतर तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 कसोटी विकेट्स

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 कसोटी विकेट्स

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 688 कसोटी विकेट्स

4. अनिल कुंबळे (भारत) - 619 कसोटी विकेट्स

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 598 कसोटी विकेट्स

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 कसोटी विकेट्स

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 कसोटी विकेट्स

8. नॅथन लियोन (ऑस्ट्रेलिया) - 496 कसोटी विकेट्स

9. रविचंद्रन अश्विन (भारत) - 486 कसोटी विकेट्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT