Quinton De Kock  Dainik Gomantak
क्रीडा

SA vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध क्विंटन डी कॉकचा मोठा पराक्रम, नावावर केला 'हा' शानदार रेकॉर्ड!

World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. संघाचा प्रत्येक खेळाडू सामन्यात आपले 100 टक्के योगदान देत आहे, त्याचाच परिणाम म्हणजे संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

फलंदाजीत क्विंटन डी कॉक संघाला केवळ चांगली सुरुवातच देत नाही तर मोठी खेळीही खेळत आहे. फलंदाजीसोबतच डी कॉक यष्टिरक्षणातही संघासाठी शानदार कामगिरी करत आहे. आता डी कॉकच्या नावावर आणखी एक विशेष कामगिरी नोंदवण्यात आली आहे.

विश्वचषक सामन्यात सर्वाधिक झेल

दरम्यान, अफगाणिस्तानसोबत (Afghanistan) खेळल्या गेलेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या नावावर एक खास कामगिरी नोंदवली गेली आहे. या सामन्यात डी कॉकने विकेटच्या मागे 6 झेल घेतले आहेत. आता डी कॉक विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक बनला आहे.

डी कॉकच्या आधी, हा पराक्रम संघाचे माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर आणि मॉर्न व्हॅन विक यांच्या नावावर होता, ज्यांनी विश्वचषकाच्या एका सामन्यात विकेटच्या मागे 4 झेल घेतले होते.

विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक झेल

याशिवाय, क्विंटन डी कॉक विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत विकेटच्या मागे सर्वाधिक झेल घेणारा जगातील चौथा यष्टिरक्षक बनला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार अॅडम गिरख्रिस्टचे नाव प्रथम येते. ज्याने विश्वचषकाच्या एका आवृत्तीत विकेटच्या मागे 21 झेल घेतले आहेत.

अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2003), 21 झेल

टॉम लॅथम (वर्ल्ड कप 2019), 21 झेल

अॅलेक्स कॅरी (वर्ल्ड कप 2019), 20 झेल

क्विंटन डी कॉक (वर्ल्ड कप 2023)*, 19 झेल

कुमार संगकारा (वर्ल्ड कप 2003), 17 झेल

अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2007), 17 झेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT