Quinton de Kock: Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: क्विंटन डी कॉकचा लखनऊमध्ये 'जलवा', शानदार शतक ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड!

AUS Vs SA: लखनऊमध्ये होत असलेल्या या सामन्यात डी कॉकने 90 चेंडूत शतक झळकावले. त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.

Manish Jadhav

Quinton De Kock Century: दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉकने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकातील सामन्यात शानदार शतक झळकावले.

लखनऊमध्ये होत असलेल्या या सामन्यात डी कॉकने 90 चेंडूत शतक झळकावले. त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. डी कॉक 106 चेंडूत 109 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह त्याने अनेक विक्रम केले.

विश्वचषकात सलग दुसरे शतक

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला (South Africa) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डी कॉकने सलामीला येऊन टेम्बा बावुमासोबत पहिल्या विकेटसाठी 108 धावा जोडल्या.

त्याने डावाच्या 30 व्या षटकात पॅट कमिन्सच्या चेंडूला षटकार खेचला आणि आपली वैयक्तिक धावसंख्या 100 पर्यंत पोहोचवली. विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. गेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते.

याशिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात शतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी हर्शल गिब्स आणि फाफ डुप्लेसिस यांनीही हा पराक्रम केला आहे.

विश्वचषकात सर्वाधिक शतके

डी कॉकचे हे विश्वचषकातील (World Cup) दुसरे शतक आहे. यासह, तो विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आला आहे. एबी डिव्हिलियर्स (4 शतके) या यादीत अव्वल स्थानावर आहे.

हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस आणि हर्शल गिब्स यांच्या नावावरही विश्वचषकात प्रत्येकी 2 शतके आहेत. यासह, त्याने वनडेत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत हर्शल गिब्स (18 शतके) मागे टाकले.

डी कॉकने त्याच्या कारकिर्दीतील 19 वे एकदिवसीय शतक झळकावले. हाशिम आमला 27 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

लखनऊमध्ये सामना रंगला

लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी ऑस्ट्रेलियाचा यजमान भारताकडून पराभव झाला.

त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT