Ecuador Team Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 च्या पूर्वी फिक्सिंग! सामन्याच्या काही तासांपूर्वीच मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

Match Fixing In FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक 2022 अधिकृतपणे 20 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यावेळी जागतिक स्पर्धेत 32 देश सहभागी होणार असून एकूण 64 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना कतार आणि इक्वाडोर यांच्यात 20 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता अल बायत स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच हा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वृत्तानुसार, यजमान देश कतारवर मॅच फिक्सिंगचा आरोप होत आहे.

पहिल्याच सामन्यात फिक्सिंगचा आरोप

FIFA विश्वचषक 2022 सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे, परंतु वृत्तानुसार, कतारने (Qatar) सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ इक्वाडोरकडून खेळाडू खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटिश मिडल ईस्ट सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्चचे प्रादेशिक संचालक अमजद ताहा (Amjad Taha) यांनी कतारी संघावर हे आरोप केले आहेत.

सामन्यातील गोलची वेळही ठरलेली असते

ब्रिटिश मिडल ईस्ट सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्चचे प्रादेशिक संचालक अमजद ताहा यांच्या मते, कतारने स्पर्धेचा पहिला सामना जिंकण्यासाठी 8 इक्वेडोरच्या खेळाडूंना $7.4 दशलक्ष (सुमारे 60 कोटी) लाच दिली आहे. कतार हा सामना 1-0 ने जिंकेल आणि हा गोल सामन्याच्या उत्तरार्धात होईल, असा खुलासाही अमजद ताहांनी केला आहे. विश्वचषकातील मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी फिफाने एफबीआयची मदत घेतली आहे. दुसरीकडे, स्पोर्टडारचे म्हणणे आहे की, यावर्षी असे जवळपास 600 सामने झाले, ज्यामध्ये फिक्सिंग झाल्याची शक्यता आहे.

या मैदानांवर फिफा विश्वचषकाचे सामने होणार

FIFA विश्वचषक 2022 कतारमधील अल खोर शहरातील अल बायत स्टेडियममध्ये सुरु होणार आहे. FIFA विश्वचषक 2022 स्पर्धेचे 64 सामने कतारमधील 8 फुटबॉल स्टेडियममध्ये होणार आहेत - अल बायत स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, लुसेल स्टेडियम, स्टेडियम 974, एज्युकेशन सिटी स्टेडियम (Stadium) आणि अल जानौब स्टेडियम. फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल येथे खेळवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT