FIFA World Cup 2022: पोलंडचा संघ F16 लढाऊ विमानांच्या घेऱ्यात कतारमध्ये दाखल

FIFA World Cup 2022: रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी सीमा सामायिक करणार्‍या त्याच देशांमध्ये पोलंडचाही समावेश आहे.
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022Dainik Gomantak

FIFA World Cup 2022: फुटबॉलचा सर्वात मोठा इव्हेंट फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup) स्पर्धेबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. सर्वांच्या नजरा कतार (Qatar)  येथे होणाऱ्या फिफा विश्वचषकावर खिळल्या आहेत. 20 नोव्हेंबरपासून 32 देशांमधली ही स्पर्धा सुरू होणार असून यामध्ये सर्व संघ सहभागी होण्यासाठी तेथे पोहोचत आहेत. पोलंडचा राष्ट्रीय संघही कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे.

पोलंडमधून संघाचे सदस्य कतारला रवाना झाले, तेव्हा त्यांना पोलंडच्या सीमेवरून सुखरूप बाहेर काढण्यासाठी (F16) फायटर जेटची मदत घेण्यात आली. पोलंड राष्ट्रीय संघाच्या सदस्यांना मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या F16 जेट विमानांच्या कडक सुरक्षेखाली देशाच्या सीमेबाहेर सोडण्यात आले. पोलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याचा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पोलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला F16 लढाऊ विमानांनी देशाबाहेर नेण्यात आले. पोलंडच्या राष्ट्रीय संघानेही याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की "आम्हाला F16 विमानांनी पोलंडच्या दक्षिण सीमेवर नेले होते! धन्यवाद आणि वैमानिकांना शुभेच्छा!"

  • पोलंडचा संघ लढाऊ विमानांच्या घेऱ्यात कतारमध्ये दाखल

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमेवरही कायम आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी सीमा शअर करणार्‍या त्याच देशांमध्ये पोलंडचाही समावेश आहे. नुकतेच पोलंड-युक्रेन सीमेवर क्षेपणास्त्र डागल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

  • पहिला सामना 22 नोव्हेंबरला होणार

20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA) पोलंड क गटात आहे. पोलंडचा पहिला सामना 22 नोव्हेंबरला मेक्सिकोसोबत होणार आहे. रॉबर्ट लेवांडोव्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडचा संघ 26 नोव्हेंबरला सौदी अरेबियाशी आणि 30 नोव्हेंबरला लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना करेल. पोलंड संघ आपला पहिला सामना जिंकण्याच्या ध्येयाने मैदानात उतरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com