Anmolpreet Singh Dainik Gomantak
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy: क्रुणाल पांड्याच्या संघाचा कडवा प्रतिकार मोडून काढत पंजाब बनला 'नवा विजेता'

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चा अंतिम सामना पंजाब आणि बडोदा संघांमध्ये खेळला गेला.

Manish Jadhav

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चा अंतिम सामना पंजाब आणि बडोदा संघांमध्ये खेळला गेला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विजय मिळवत पंजाबने इतिहास रचला.

पंजाबने (Punjab) मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदवून प्रथमच ही स्पर्धा जिंकली. याआधी पंजाबने 4 वेळा अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते.

अनमोलप्रीत सिंगचे वादळ

दरम्यान, या सामन्यात बडोद्याचा कर्णधार क्रुणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 223 धावा केल्या होत्या.

या सामन्यात अनमोलप्रीत सिंगने सर्वात मोठी खेळी खेळली. अनमोलप्रीतने 61 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. त्याचवेळी, निहल वधेराने तुफानी खेळी केली. त्याने 27 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या.

बडोद्याचा 20 धावांनी पराभव झाला

दुसरीकडे, 224 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोदा संघ 20 षटकात केवळ 203 धावा करु शकला आणि 20 धावांनी सामना गमावला. बडोद्यातर्फे अभिमन्यू सिंग राजपूतने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर निनाद राठवाने 47 आणि कर्णधार क्रुणाल पांड्याने 45 धावा केल्या.

अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी

अनमोलप्रीत सिंग फलंदाजीला आला तेव्हा पंजाबच्या संघाने 18 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर त्याने संघाची धुरा सांभाळली आणि स्पर्धेच्या इतिहासातील अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही केली.

त्याचबरोबर, स्पर्धेच्या अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी 2019-20 हंगामात कर्नाटकने (Karnataka) तामिळनाडूविरुद्ध 5 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT