Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

Shikhar Dhawan: गब्बरनं कोहलीला पछाडलं! ताबडतोड फिफ्टी ठोकत 'या' विक्रमाला घातली गवसणी

IPL 2023: शिखर धवनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक करत विराटचा मोठा विक्रम मागे टाकला आहे

Pranali Kodre

Shikhar Dhawan IPL Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघासमोर 198 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने अर्धशतकी खेळी करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने आक्रमक फलंदाजी करताना 60 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर त्याचा साथीदार सलामीवर शिखर धवनने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला आणि ताबडतोड फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे डाव संपला, तेव्हा शिखरने 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 86 धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने 20 षटकात 4 बाद 197 धावा केल्या. दरम्यान, आयपीएलमध्ये 50 धावांचा टप्पा पार करण्याची शिखरची ही 50 वी वेळ होती. त्याने आत्तापर्यंत 2 शतके आण 48 अर्धशतके केली आहेत.

त्यामुळे आता आयपीएलमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा शिखर 50 धावांचा टप्पा ओलांडणारा शिखर तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांनी केला आहे.

वॉर्नरने 60 वेळा आयपीएलमध्ये 50 धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विराटनेही 50 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.

  • आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा 50 धावांचा टप्पा पार करणारे फलंदाज -

  • 60 वेळा - डेव्हिड वॉर्नर

  • 50 वेळा - शिखर धवन

  • 50 वेळा - विराट कोहली

  • 43 वेळा - एबी डिव्हिलियर्स

  • 41 वेळा - रोहित शर्मा

विराटला टाकले मागे

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये 208 सामन्यांमधील 207 डावात फलंदाजी करताना शिखरने 50 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद 50 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने विराटला मागे टाकले आहे.

विराटने 216 आयपीएल डावात 50 व्यांदा 50 धावांचा टप्पा पार केला होता. या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने 132 डावातच 50 व्यांदा 50 धावांचा टप्पा पार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

Cigarette Price Hike 2026: सिगारेटचा झुरका आता महागला, पण बिडी झाली स्वस्त! अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्ट्रक्चरच बदललं

Union Budget 2026: मच्छिमारांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! खोल समुद्रातील मासेमारीसाठी दिली सवलत; हटवले सगळे अडथळे

SCROLL FOR NEXT