Mohammad Amir vs Faheem Ashraf Fight Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "मैदानावर क्रिकेट की कुस्ती?" मोहम्मद आमीरच्या स्लेजिंगवर भडकला फहीम अश्रफ, मारण्यासाठी उगारली बॅट; व्हिडिओ व्हायरल

Mohammad Amir vs Faheem Ashraf Fight: पाकिस्तान सुपर लीगचा 11वा हंगाम सध्या सुरु आहे, मात्र हा हंगाम खेळाडूंच्या खेळापेक्षा मैदानावर घडणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळेच जास्त चर्चेत आहे.

Manish Jadhav

Mohammad Amir vs Faheem Ashraf Fight: पाकिस्तान सुपर लीगचा 11वा हंगाम सध्या सुरु आहे, मात्र हा हंगाम खेळाडूंच्या खेळापेक्षा मैदानावर घडणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळेच जास्त चर्चेत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला फखर झमानवर बॉल टॅम्परिंगचे आरोप झाले आणि त्याला काही सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच, 23 एप्रिल रोजी रावलपिंडी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात झालेल्या सामन्यात चक्क 'डब्लू डब्लू ई' (WWE) सारखा थरार पाहायला मिळाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि अष्टपैलू खेळाडू फहीम अश्रफ यांच्यात मैदानावरच जोरदार बाचाबाची झाली, ज्यामध्ये फहीम बॅट घेऊन आमीरला मारण्यासाठी धावल्याचे धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या 34व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडची फलंदाजी सुरु असताना हा प्रकार घडला. इस्लामाबादचा संघ अवघ्या 79 धावांत 5 गडी गमावून संकटात सापडला होता. अशा वेळी फहीम अश्रफने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 11 धावांवर असताना मोहम्मद आमीरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानकडे झेल देऊन बाद झाला. फहीम बाद झाल्यानंतर आमीरने आक्रमकपणे जल्लोष केला आणि फहीमला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. आमीरचे हे वर्तन पाहून फहीमचा संयम सुटला आणि तो संतापून चक्क बॅट उगारत आमीरच्या दिशेने धावला. फहीमची आक्रमक वृत्ती पाहून मैदानावरील खेळाडू आणि पंचांचीही धाकधूक वाढली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रावलपिंडी संघाच्या इतर खेळाडूंनी तातडीने हस्तक्षेप केला. फहीम आमीरपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सहकाऱ्यांनी त्याला पकडून रोखले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आमीरदेखील फहीमला काही अपशब्द बोलताना दिसला, ज्यामुळे मैदानावरील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीला हरताळ फासल्याची टीका क्रीडाप्रेमींकडून होत आहे.

सामन्याचा विचार केला तर रावलपिंडी संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकण्यात यश मिळवले. मात्र, त्यांच्यासाठी हा संपूर्ण हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखाच राहिला. चालू हंगामातील 9 सामन्यांपैकी सुरुवातीचे सलग 8 सामने रावलपिंडीने गमावले असून या राड्यानंतर मिळालेला हा त्यांचा मोसमातील पहिलाच विजय ठरला. विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी खेळाडूंच्या या गैरवर्तणुकीमुळे पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाच्या शिस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT