Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: तो मी नव्हेच! 'बायको'चा उल्लेख असलेल्या त्या पोस्टवर शॉचं स्पष्टीकरण

मंगळवारी पृथ्वी शॉच्या बाबतीतली एक व्हॅलेंटाईनची पोस्ट व्हायरल झाली होती, याबद्दल आता त्यानेच स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

Prithvi Shaw: भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ मंगळवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चांगलाच चर्चेत आला होता. त्याचा आणि अभिनेत्री निधी तापडियाचा समावेश असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर आता स्वत: शॉ याने याबद्दल खुलासा केला आहे.

खरंतर मंगळवारी जी पोस्ट व्हायरल झाली होती, त्यात शॉ आणि निधी रोमँटिक पोजमध्ये दिसत होते. तसेच त्यावर 'बायकोला व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा' (हॅपी व्हॅलेंटाईन्स माय वायफी) अशा अर्थाचे कॅप्शन टाकले होते.

ही पोस्ट शॉ याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आली असल्याचा दावा चाहत्यांनी केला होता. तसेच चाहत्यांच्या दाव्यानुसार शॉ याने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर काहीवेळातच डिलीट केली होती.

शॉ म्हणतोय असं काही केलंच नाही

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शॉने लगेचच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल स्पष्टीकरण दिले. त्याने सांगितले की व्हायरल झालेला फोटो एडिट केलेला आहे. तसेच त्याने असे काही केलेले नाही. त्याचबरोबर त्याने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची विनंतीही केली.

त्याने त्याच्या स्पष्टीकरणाच्या पोस्टमध्ये लिहिले की 'कोणीतरी माझे फोटो एडिट केले आहेत आणि जो व्हायरल झालेला फोटो आहे तो मी माझ्या स्टोरीवर किंवा माझ्या पेजवर कधीही शेअर केलेला नाही. त्यामुळे सर्व टॅग्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष करा. '

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शॉ आणि निधी यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण त्यांच्या नात्याबद्दल दोघांकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

शॉ करतोय पुनरागमनाची प्रतिक्षा

शॉ गेल्या दीडवर्षापासून भारतीय संघातून दूर आहे. त्यामुळे सध्या त्याला भारतीय संघात पुनरागमनाची प्रतिक्षा आहे. त्याला गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नव्हते. त्यामुळे अजूनही तो भारतीय संघात पुनरागमनाची प्रतिक्षा करत आहे.

शॉ याने आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून 339 धावा केल्या आहेत. तसेच 6 वनडे सामने खेळले असून 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला असून त्याला यात एकही धाव करता आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT