Prithvi Shaw  Dainik Gomantak
क्रीडा

SMAT 2022: अबबं! T20 मध्ये बंबईच्या धाकडने 46 चेंडूत झळकावले शतक

Prithvi Shaw Century: भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉने टी-20 मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Syed Mushtaq Ali T20, Prithvi Shaw: भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉने टी-20 मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत त्याने 46 चेंडूत शतक झळकावले. टी-20 फॉरमॅटमधील त्याचे हे पहिले शतक आहे. 22 वर्षीय पृथ्वीने शुक्रवारी आसामविरुद्धच्या सामन्यात 134 धावांची शानदार खेळी खेळली.

220 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 46 चेंडूत शतक

आसामचा (Assam) कर्णधार मृणमय दत्ताने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण पृथ्वी एक मिशन घेऊन मैदानात उतरला. कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि अमन खानने सलामीची जबाबदारी घेतली. पृथ्वीने 46 चेंडूत टी-20 मधील पहिले शतक पूर्ण केले.

आसामच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला

राजकोटच्या एससीए स्टेडियमवर झालेल्या या गट-अ सामन्यात पृथ्वी शॉने सलामीची जबाबदारी स्वीकारली आणि संघाची धावसंख्या 230 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पृथ्वीने आसामच्या गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. सुमारे 220 च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने 134 धावा केल्या. पृथ्वीच्या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. यशस्वी जैस्वालच्या साथीने त्याने दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. पृर्थ्वी जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा मुंबईची (Mumbai) धावसंख्या 206 धावांपर्यंत पोहोचली होती.

मुंबईने आसामसमोर 231 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते

मुंबई संघाने निर्धारित 20 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 203 धावा करत आसामला 231 धावांचे लक्ष्य दिले. यशस्वीने 30 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. शिवम दुबेने 7 चेंडूत 17 तर सर्फराज खान 15 चेंडूत 15 धावा करुन नाबाद परतले. रियान पराग, रोशन आलम आणि रज्जाकुद्दीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले

पृथ्वी शॉने चार वर्षांपूर्वी कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याने राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळली. आतापर्यंत त्याने एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. 2020 मध्ये त्याने एकदिवसीय आणि 2021 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये फक्त एकच सामना खेळू शकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT