GCA Ground Dainik Gomantak
क्रीडा

GCA Ground : पर्वरी मैदानाच्या खेळपट्ट्यांना ‘स्पोर्टिंग’ साज; जीसीए सचिव रोहन देसाई यांची माहिती

आगामी मोसमातील सामन्यांसाठी तयारी

किशोर पेटकर

Porvorim News : पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावरील खेळपट्ट्यांना लागलेला ‘पाटा’ डाग पुसून काढण्यासाठी गोवा क्रिकेट संघटनेचे कंबर कसली असून आगामी मोसमापूर्वी ‘स्पोर्टिंग’ साज मिळेल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रोहन गावस देसाई यांनी दिली.

आगामी मोसमातील क्रिकेट सामन्यांसाठी नूतनीकरण स्वरूपातील खेळपट्ट्या सज्ज होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘‘चांगले क्रिकेट खेळले जावे या उद्देशाने आम्ही खेळपट्ट्यांचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मी गतमोसमातच इच्छुक होतो, पण पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याचे काम यंदा मोसमाच्या सुरवातीस पूर्ण करण्याचे ठरविले. मैदानावरील पाचपैकी दोन खेळपट्ट्यांसाठी लाल माती वापरली आहे. त्यामुळे स्पोर्टिंग निकाल अपेक्षित आहेत. बाकी खेळपट्ट्यांसाठी काळी माती वापरण्यात येत आहे,’’ असे रोहन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की ‘‘खेळपट्टीविषयक तज्ज्ञांच्या माहितीनुसार लाल मातीच्या खेळपट्टी स्पोर्टिंग असतात, त्यामुळे आम्ही या मातीच्या खेळपट्ट्यांना प्राधान्य दिले आहे.’’

रोहन यांनी गतमोसमातील उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘या मैदानावर गतमोसमात कर्नाटकविरुद्धचा रणजी करंडक सामना मोसमाच्या सुरवातीस झाला. कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना सहाशे धावांचा डोंगर रचला. आम्हाला अशाप्रकारच्या खेळपट्ट्या नको आहेत. आमच्या खेळाडूंचेही असेच म्हणणे आहे. त्यामुळे विचारविनिमय केल्यानंतर खेळपट्ट्यांचे काम करण्याचे ठरले. स्पोर्टिंग खेळपट्ट्यांमुळे फलंदाज व गोलंदाजांना समान संधी मिळेल.’’

यंदा बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील एकूण १० सामने गोव्यात होणार आहेत, त्यापैकी चार सामने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आहेत. नियोजनानुसार पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत चारही रणजी क्रिकेट सामने खेळले जातील. तोपर्यंत नव्याने काम करण्यात आलेल्या खेळपट्ट्यांच्या मशागतीसाठी पुरेसा वेळ जीसीएला मिळेल.

पर्वरीतील रणजी क्रिकेट सामने

(२०१० ते २०२३)

एकूण सामने : ३४

गोवा विजयी : ९, पराभूत : १०, अनिर्णित : १५

गोव्याविरुद्ध धावांचा डोंगर

पंजाब : सर्वबाद ६३५ (२४ ते २७ ऑक्टोबर २०१७)

कर्नाटक : ७ बाद ६०३ घोषित (२७ ते ३० डिसेंबर २०२२)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT