Prashant Kakode Dainik Gomantak
क्रीडा

‘Indian Cricket Association’ वर प्रशांत काकोडे यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे माजी रणजी कर्णधार, प्रशिक्षक प्रशांत काकोडे भारतीय क्रिकेटर्स संघटनेवर (आयसीए) बिनविरोध ठरले, त्यामुळे त्यांना आता गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीत राज्यातील क्रिकेटपटूंतर्फे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

(Prashant Kakode has been elected to the Indian Cricketers Association unopposed )

‘आयसीए’ निवडणूक प्रक्रिया शनिवारी संपली. नव्या समितीचा कार्यकाळ 2022 ते 2025 पर्यंत असेल. काकोडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सदस्य संघटना गटातून निवडून आले आहेत. गोव्यातर्फे ‘आयसीए’वर बिनविरोध ठरलेले ते पहिले प्रतिनिधी ठरले आहेत. गोव्यातील महिला क्रिकेटपटू प्रतिनिधीसाठी उमेदवारी अर्ज नसल्याने आयसीए त्या जागी नंतर प्रतिनिधी नियुक्त करणार असल्याची माहिती आहे.

आयसीए सचिवपदी हितेश मजुमदार निवडून आले. आयसीए सदस्य प्रतिनिधीच्या दोन पदांवर शांता रंगास्वामी व यजुर्विंद्रसिंग बिल्खा निवडून आले. बीसीसीआय सर्वोच्च परिषदेवर आयसीए पुरुष प्रतिनिधी म्हणून माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर निवडून आले. त्यांनी अशोक मल्होत्रा यांना पराभूत केले. या परिषदेवर महिला प्रतिनिधी शुभांगी कुलकर्णी असतील.

आयपीएल मंडळावर आयसीए प्रतिनिधी म्हणून माजी कसोटीपटू प्रग्यान ओझा यांची निवड झाली. त्यांनी विजय मोहन राज यांचा पराभव केला. आयसीएच्या अध्यक्षपदी अंशुमन गायकवाड, तर खजिनदारपदी व्ही. कृष्णस्वामी निवडून आले.

राज्य क्रिकेटमधील ‘अष्टपैलू’

वेगवान गोलंदाज या नात्याने गोव्यातील क्रिकेटमध्ये छाप पाडलेले प्रशांत काकोडे 1995-96 ते 1999-2000 या कालावधीत 12 रणजी क्रिकेट सामने खेळले. एकवेळ डावात 5 गडी बाद करताना त्यांनी एकूण 15 विकेट मिळविल्या, तर लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेटमध्ये 21 सामन्यांत 16 गडी बाद केले.

निवृत्तीनंतर त्यांनी गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले.ते रणजी निवड समितीचे सदस्यही होते. ते प्रशिक्षक असताना धेंपो क्रिकेट क्लबने जीसीए प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली होती. क्रिकेट संघ व्यवस्थापक, बीसीसीआय क्रिकेट सामनाधिकारी, गोवा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या नात्यानेही त्यांनी योगदान दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT