BCCI ने कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकारामुळे भारताचा (Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावरील T20 मालिका पुढे ढकलली आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

Omicron Variant: भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा पुढे ढकलला

या मालिकेतील पहिला सामना 17 ऐवजी आता 26 डिसेंबरला होणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत आज यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

BCCI ने कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकारामुळे भारताचा (Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावरील T20 मालिका पुढे ढकलली आहे. या मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 ऐवजी आता 26 डिसेंबरला होणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत आज यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमाला मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने हा दौरा किमान सात दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या दौऱ्यातील टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे नवीन वेळापत्र आणि ठिकांणांची घोषणा पुढील 48 तासांत होण्याची शक्यता आहे. जय शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआयने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला सांगितले की, भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. उर्वरित चार टी-20 सामने त्यानंतर खेळविले जातील.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगिल्यानुसार, “हे दुर्दैवी आहे पण होय, आम्ही तारखा एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज किंवा उद्या क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून याबाबत अंतिम पुष्टी करण्यात येईल. आम्ही पुढील वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी परत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या आगमनाच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहेत. आता भारतीय संघ आठवडाभर उशिराने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा कडक कोरोना प्रोटोकॉलसह असेल.तसेच खेळाडूंची सुरक्षा पाहून ठिकाणे निवडली जातील. “जैव-सुरक्षित वातावरण लक्षात घेऊन सामन्यांची ठिकाणे निवडण्यात येणार आहेत. आमचे मुख्य लक्ष सुरक्षिततेवर असेल ज्यात प्रवेशाचे कठोर नियम आणि बायो बबलच्या बाहेर कोणालाही जाण्यास किंवा येण्यास परवानगी नसेल.

कोरोना व्हायरसच्या Omicron प्रकाराने दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातला आहे. याची दररोज 200 नवीन प्रकरणे येथे समोर येत आहेत. शुक्रवार पर्यंत अफ्रिकेत एकूण 16 हजार प्रकरणे होती. नेदरलँड संघाने नुकताच अफ्रिकेचा दौरा अर्ध्यावर सोडला होता. काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याने सीएसएला घरचे सामनेही पुढे ढकलावे लागले. भारत अ संघ मात्र दक्षिण आफ्रिकेतच राहिला, त्यामुळे वरिष्ठ संघाचा दौरा रद्द होणार नाही अशी आशा आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेतून येणारी उड्डाणे देखील बंद केलेली नसून ती 'जोखीम' श्रेणीमध्ये ठेवली आहेत. भारतीय संघाचा दौरा रद्द झाल्यास दक्षिण आफ्रिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. सीएसएचे कार्यकारी सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी या कठीण काळात एकत्र उभे राहिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत. फोलेत्सी मोसेकी म्हणाले, मी क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि भारतीय क्रिकेट बोर्ड या दोघांचेही आभार मानू इच्छितो त्यांनी हा दौरा रद्द न करता व्हावा यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. या अनिश्चिततेच्या काळातही दोन्ही मंडळांनी आपल्या आशा कायम ठेवल्या आणि हा दौरा नक्की होईल, असे आश्वासन दिले आहे.

एका माध्यमाने या आधीच सांगितले होते की, अफ्रिकेचा दौरा काही दिवसांसाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. दक्षिण अफ्रिकेत कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराच्या उद्रेकामुळे बीसीसीआयने टी-20 मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार होता. यादरम्यान तीन कसोटी, तीन वनडे आणि चार टी-२० सामने खेळवले जाणार होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यापूर्वी सरकारशी सल्लामसलत करावी कारण तेथे कोरोनाच्या केसेस वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT