Poonam Pandey made a big claim on Cricketers Dainik Gomantak
क्रीडा

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

Poonam Pandey made a big claim on Cricketers: आपल्या बोल्ड लूक आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

Sameer Amunekar

मुंबई: आपल्या बोल्ड लूक आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतःच्या निधनाची खोटी अफवा पसरवून सर्वांना धक्का देणाऱ्या पूनमने आता थेट क्रिकेट जगतातील खेळाडूंवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीत तिने दावा केला आहे की, अनेक नामवंत क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटी तिला सोशल मीडियावर मेसेज करतात, मात्र त्यांचा हेतू फक्त 'टाइमपास' करण्याचा असतो.

ब्लू टिक असलेल्या सेलिब्रिटींचा सुळसुळाट

एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूनमला विचारण्यात आले होते की, तिला मोठ्या दिग्दर्शकांकडून किंवा 'ब्लू टिक' (व्हेरिफाईड अकाउंट) असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींकडून मेसेज येतात का? यावर उत्तर देताना तिने मान्य केले की, केवळ सिनेसृष्टीतील कलाकारच नव्हे, तर क्रिकेट विश्वातील अनेक मोठे खेळाडू तिला वारंवार मेसेज पाठवत असतात. तिने सांगितले की, हे लोक सुरुवातीला कौतुक करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. ते माझ्यासोबत वेळ घालवण्याची, फिरण्याची इच्छा व्यक्त करतात.

"फक्त हँगआउट करायचं असतं", पूनमचा गंभीर आरोप

क्रिकेटर्सच्या मेसेज करण्याच्या पद्धतीवर भाष्य करताना पूनम म्हणाली, "या खेळाडूंना माझ्यासोबत कोणतही नातं मरोय. त्यांना फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा किंवा हँगआउट करायचे असते." एका विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख करताना तिने सांगितले की, एका क्रिकेटपटूने तिला वारंवार 'क्यूट' असल्याचे मेसेज केले होते, ज्यामुळे कंटाळून तिला शेवटी त्या खेळाडूला ब्लॉक करावे लागले. "स्वतःला काय समजतात हे लोक?" असा संतापही तिने यावेळी व्यक्त केला.

सोशल मीडियावर टीकेची झोड आणि जुन्या वादांची आठवण

पूनम पांडेचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या मते, हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी रचलेले नाटक आहे. दरम्यान, क्रिकेटर्सवर अशा प्रकारचे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी खुशी मुखर्जीने सूर्यकुमार यादववर मेसेज पाठवल्याचे आरोप केले होते, ज्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता पूनमच्या या दाव्यांमुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT