Julian Alvarez  Dainik Gomantak
क्रीडा

Poland vs Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनासह पोलंडदेखील 'राऊंड ऑफ 16'मध्ये दाखल

फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिना आणि पोलंड यांनी ग्रुप सी मधून बाद फेरीत प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

Poland vs Argentina: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये बुधवारी ग्रुप सी मधील पोलंड विरुद्ध अर्जेंटिना सामना झाला. स्टेडियम 974 येथे झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 असा विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटिनाने अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवले आहे. केवळ अर्जेंटिनानेच नाही, तर पोलंडही पराभवानंतरही अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

ग्रुप सी मध्ये अर्जेंटिनाने (Argentina) 6 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे आणि पोलंडने (Poland) 4 गुणांसह मेक्सिकोला गोल फरकाच्या आधारावर मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आणि तब्बल 36 वर्षांनंतर बाद फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने पोलंडवर वर्चस्व ठेवले होते. पण, तरी त्यांना गोल करण्यात अपयश आले. पोलंडचा गोलरक्षक वोज्शिच स्झेस्नी संपूर्ण पहिल्या हाफमध्ये व्यस्त राहिला होता, कारण अर्जेंटिनाकडून सातत्याने गोलसाठी आक्रमण होत होते.

विशेष म्हणजे पहिल्या हाफमध्ये मेस्सीनेही (Lionel Messi) पेनल्टीवर गोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण, वोज्शिच स्झेस्नीने तो गोल अप्रतिमरित्या अडवला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोलची नोंद झाली नाही.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये 46 व्या मिनिटालाच ऍलेक्सिस मॅक ऍलिस्टरने अर्जेंटिनासाठी पहिला गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ज्युलियन अल्वारेझने 67 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल करत आघाडी आणखी भक्कम केली. नंतर पोलंडला सामन्यात परत येण्याची संधी मिळाली नाही.

आता बाद फेरीत अर्जेंटिनाला 3 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे, तर पोलंड 4 डिसेंबर रोजी फ्रान्सचा सामना करतील.

ग्रुप सी मध्ये मेक्सिको-सौदी अरेबिया बाहेर

बुधवारी ग्रुप सी मधील मेक्सिको आणि सौदी अरेबिया हे संघही आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये मेक्सिकोने 2-1 अशा गोल फरकाने विजय मिळवला होता. पण या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले. मेक्सिकोचेही 4 गुण होते. पण ते गोलफरकाच्या बाबतील पोलंडच्या मागे पडले. तसेच सौदीचे केवळ 3 गुणच होते. त्यामुळे त्यांचेही आव्हान संपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT