Puneri Paltan vs Haryana Steelers X/ProKabaddi
क्रीडा

Pro Kabaddi: यंदा मिळणार नवा विजेता; पुणेरी पलटण - हरियाणा स्टिलर्स फायनलमध्ये आमने-सामने, कुठे अन् कसा पाहाणार सामना?

Puneri Paltan vs Haryana Steelers final: प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामाचा अंतिम सामना पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात होणार आहे.

Pranali Kodre

Pro Kabaddi Season 10, Puneri Paltan vs Haryana Steelers final:

प्रो कबड्डीचा 10 वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात असून अंतिम सामना शुक्रवारी (१ मार्च) होणार आहे. या हंगामात पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टिलर्स या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

त्यामुळे यंदा प्रो कबड्डीला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी हरियाणा स्टिलर्स आणि पुणेरी पलटण यांनी यापूर्वी कधीही विजेतेपद जिंकलेले नाही.

उपांत्य फेरीत पुणे - हरियाणाचा विजय

पुणेरी पलटणने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करताना साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यामुळे त्यांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तीनवेळच्या विजेत्या पटना पायरेट्सला 37-21 अशा फरकाने पराभव करत पुणेरी पलटणनने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

तसेच हरियाणा स्टिलर्सने साखळी फेरीनंतर पाचवा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. हरिणायाना स्टिलर्सने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा 25-42 अशा फरकाने पराभव केला, तर उपांत्य फेरीत हरियाणाने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचा 31-27 अशा फरकाने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

कुठे आणि कधी पाहाणार अंतिम सामना?

पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात शुक्रवारी होणारा अंतिम सामना रात्री 8 वाजता हैदराबादच्या जीएसी बालायोगी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गच्चिबावली येथे सुरु होणार आहे.

प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर होणार आहे, तर ऑनलाईन प्रक्षेपण डीज्नी प्लस हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर होणार आहे.

आमने-सामने आकडेवारी

पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात आत्तापर्यंत 14 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 8 वेळा पुणेरी पलटणने विजय मिवला आहे. तसेच हरियाणा स्टिलर्सने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर दोनवेळा या दोन्ही संघांच्या सामन्यात बरोबरी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT