Phillip Hughes Dainik Gomantak
क्रीडा

Phillip Hughes: क्रिकेट इतिहासातील दुर्दैवी घटना; जेव्हा बाऊंसर लागल्याने ऑसी क्रिकेटरने गमावलेला जीव

Phillip Hughes: नऊ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटपटूला बाऊंसर लागल्याने जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Phillip Hughes : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा विक्रम होताना पाहण्यात येतात, मात्र याच मैदानात काही अशाही दु:खद घटना घडल्या आहेत, ज्यांची आठवण त्रासदायक ठरते. अशीच एक घटना म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या फिलीप ह्यूजचे निधन.

त्याच्या निधनाला 27 नोव्हेंबर रोजी 9 वर्षे झाले. यानिमित्ताने अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी तसेच क्रिकेट चाहत्यांनी त्याची आठवण काढली आहे.

डोक्याला चेंडू लागल्याने झालेले निधन

ह्यूजला 24 नोव्हेंबर 2014 रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेफिल्ड शिल्ड या देशांतर्गत स्पर्धेत खेळत असताना डोक्याला चेंडू लागला होता. तो दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून न्यू साऊथ वेल्स संघाविरुद्ध त्यावेळी सामना खेळत होता. या सामन्यात 63 धावांवर नाबाद असताना सीन ऍबॉटने टाकलेला बाऊंसर त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस लागला.

त्यामुळे तो मैदानावरच कोसळला होता. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले. त्यानंतर त्याने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, 27 नोव्हेंबर 2014 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्या घटनेनंतर त्याला जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. तसेच त्यानंतर क्रिकेटपटूंच्या सुरक्षित हेल्मेटचा प्रश्नही चर्चेत आलेला.

त्या घटनेनंतर ज्या गोलंदाजाचा चेंडू त्याला लागला तो गोलंदाज म्हणजेच सीन ऍबॉट मानसिक तणावातही गेला होता. पण काही दिवसांनी तो यातून बाहेर आला. जो चेंडू ह्यूजला लागला, त्यावर ऍबॉटने 'आय एम सॉरी फिल' असे लिहिले होते.

ह्यूजची कारकिर्द

ह्यूज ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्याने 2009 साली कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच 2013 मध्ये वनडेत आणि 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याचे पदार्पण झाले होते.

त्याने कारकिर्दीत 26 कसोटी सामने खेळताना 3 शतके आणि 7 अर्धशतकांसह धावा केल्या होत्या. तसेच 25 वनडे सामन्यात 2 शतकांसह 826 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. त्याने खेळलेल्या एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 6 धावा केलेल्या.

तो 2013 साली ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून भारत दौऱ्यावरही आला होता. त्याने भारतात वनडे आणि कसोटी मालिकाही खेळली होती. यादरम्यान त्याने जयपूरमध्ये वनडेत 83 धावांची खेळी केली होती. तसेच मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात त्याने 61 धावांची खेळी केलेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT