Pathum Nissanka  Dainik Gomntak
क्रीडा

World Cup 2023: कोहली-स्मिथच्या क्लबमध्ये सामील होण्याची निसांकाची संधी हुकली, एवढ्या धावा राहिला दूर!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 30 वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 30 वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यांचा सलामीचा फलंदाज पथुम निसांका विश्वचषकाच्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून वंचित राहिला.

निसांकाने या मेगा स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने या सामन्यापूर्वी सलग चार अर्धशतकांच्या खेळी खेळल्या होत्या. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकले.

निसांकाला कोहली आणि स्मिथची बरोबरी करता आली असती

दरम्यान, विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच खेळाडूंना सलग पाच वेळा पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या आहेत. 2015 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग पाचवेळा हा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह हा पहिला खेळाडू ठरला.

यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) 2019 विश्वचषकातही सलग पाच अर्धशतकांची खेळी खेळली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात निसांकाने आपले अर्धशतक पूर्ण केले असते तर कोहली-स्मिथसह तोही या खास क्लबचा भाग बनला असता.

श्रीलंकेला अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे

दुसरीकडे, या विश्वचषकाची सुरुवात श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघासाठी चांगली झाली नाही ज्यात त्यांना पहिल्या पाचपैकी तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी कर्णधार दसून शनाकाही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होता.

मात्र, नेदरलँड्सविरुद्धचा चौथा सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने पाचव्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत थेट चार गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान गाठले.

अव्वल-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी श्रीलंकेला आपले उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT