Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: पॅट कमिन्सने मोडला सुरेश रैनाचा 8 वर्षांचा जुना रेकॉर्ड

जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असणाऱ्या कमिन्सने (Pat Cummins) 8 वर्ष जुना विक्रम मोडला.

दैनिक गोमन्तक

तयारी आंद्रे रसेलविरुद्ध होती, पण पॅट कमिन्सचे वादळ आले. असेच काहीसे मुंबई इंडियन्सच्या बाबतीत घडले, कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलला (Andre Russell) केवळ 11 धावांवर बाद केल्यानंतर मुंबईचा विजय निश्चित असल्याचे मानले जात होते. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये पहिला सामना खेळत असलेल्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) धडाकेबाज फलंदाजी केली, जी आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासात आजपर्यंत पाहायला मिळाली नाही. जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असणाऱ्या कमिन्सने 8 वर्ष जुना विक्रम मोडला. (Pat Cummins has broken Suresh Raina's 8-year-old record)

दरम्यान, कमिन्सने बुधवार, 6 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) केवळ 15 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी उभारुन आपल्या संघाला विजय तर मिळवून दिलाच, पण सर्वांना चकित केले. षटकारांचा पाऊस पाडत कमिन्सने अवघ्या 14 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या खेळीसह कमिन्सने सुरेश रैनाचा 8 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. कमिन्सने 373.33 च्या स्ट्राइक रेटने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील एका डावातील सर्वात स्फोटक स्ट्राईक रेटचा हा विक्रम आहे. जर आपल्याला 15 चेंडूंच्या खेळीबद्दल बोलायचे झाल्यास तर यापूर्वी हा विक्रम रैनाच्या नावावर होता. CSK च्या या दिग्गजाने 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Punjab Kings) विरुद्ध 348 च्या स्ट्राइक रेटसह केवळ 25 चेंडूंमध्ये 87 धावांची धमाकेदार खेळी खेळली होती.

तसेच, केकेआरच्या या ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मुंबई इंडियन्सची धुळधान केली. यापूर्वी 2020 मध्येही कमिन्सने मुंबईविरुद्धच दोन स्फोटक खेळी खेळल्या होत्या. त्यानंतर पहिल्या सामन्यात कमिन्सने 275 च्या स्ट्राईक रेटने केवळ 12 चेंडूत 33 धावा (1 four, 4 sixes) केल्या. त्यानंतर त्याच मोसमातील दुसऱ्या टक्करमध्ये त्याने 147 च्या स्ट्राइक रेटने 36 चेंडूत नाबाद 53 धावा (5 fours, 2 sixes) केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT