Smriti Mandhana - Palash Muchhal Dainik Gomantak
क्रीडा

Smriti Mandhana Video: स्मृती - पलाशच्या नात्यावर शिक्कामोर्तब? लाईव्ह कॉन्सर्टमध्येच म्हणाला 'आय लव्ह यू...'

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती मानधाना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना एका व्हिडिओमुळे उधाण आले आहे.

Pranali Kodre

Smriti Mandhana - Palash Muchhal Viral Video: भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना नेहमीच तिच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत असते. भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या मानधनाने अनेकदा तिच्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली आहे.

मानधना अनेक क्रिकेट चाहत्यांचा क्रश ओळखली जाते. पण तिचे नाव गेल्या काही महिन्यांपासून पलाश मुच्छलबरोबर जोडले जात आहे. पलाश हा म्युझिक कंपोझर आहे. तसेच तो प्रसिद्ध म्युझिक कम्पोझर आणि गायिका पलक मुच्छलचा लहान भाऊ आहे.

दरम्यान, पलाश आणि स्मृती यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पलाश स्मृतीबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की पलाश त्याच्या बहिणीबरोबर एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कार्यक्रम करत आहे. या दरम्यान त्याने हजारो लोकांसमोर स्मृतीबद्दल प्रेम व्यक्त केले.

यावेळी तो एक गाणे त्याच्या गर्लफ्रेंडला समर्पित करत असल्याचे सांगितले, तसेच त्याने 'आय लव्ह यू टू स्मृती' असेही म्हटले. यावेळी स्मृतीने त्याला आधी आय लव्ह यू म्हटल्याचाही कयास लावला जात आहे. तसेच या व्हिडिओनंतर स्मृती आणि पलाश यांच्या नात्यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

यापूर्वीही अनेकदा दिसलेत एकत्र

स्मृती आणि पलाश यापूर्वीही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. पलाशची बहीण पलकच्या लग्नाच्या अनेक कार्यक्रमांमध्येही स्मृती उपस्थित होती. तसेच नुकतेच स्मृतीने 27 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ती बांगलादेश दौऱ्यावर होती. तेव्हा तिला सरप्राईज देण्यासाठी पलाश बांगलादेशला गेला होता, अशीही चर्चा होती.

तसेच ते गेल्या ४ वर्षापासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जाते. दोघेही अनेकदा सोशल मीडियावरही एकत्र फोटो शेअर करत असतात. त्याचमुळे त्यांच्यातील रिलेशनशीपच्या चर्चांना सुरुवात झाली.

Smriti Mandhana - Palash Muchhal

दरम्यान, सध्या स्मृती इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग खेळण्यासाठी गेली आहे. यादरम्यान पलाशही इंग्लंडमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही ऍशेस मालिकेतील अखेरच्या सामन्याला द ओव्हल मैदानावर हजेरी लावल्याचे फोटो शेअर केले होते.

तथापि, त्यांनी वेगवेगळे फोटो शेअर केले होते. पण दोघांच्याही फोटोचे बॅकराउंड सारखेच होते, तसेच ऍशेस सामन्याचाच फोटो असल्याचेही त्यांनी कॅप्शनमध्ये टाकले होते, त्यावरून ते एकत्र असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dodamarg Accident: पुढच्या सीटसाठी चिमुरडीनं हट्ट केला अन्... गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा दोडामार्गात भीषण अपघात

Hard Decision! विश्वचषक संघातून शुभमन गिलला डच्चू का? कॅप्टन सूर्याने सांगितलं संघ निवडीमागचं 'ते' मुख्य कारण

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT